MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
MLA Sunil Kamble – (The Karbhari News Service) – आमदार सुनील कांबळे यांना लोकमत समूहा कडून महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडन मध्ये अभिनेता सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी आमदार कांबळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, लंडन येथे लोकमत तर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात “लोकमत महाराष्ट्ररत्न – २०२५ या पुरस्काराने माझा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा नाही, तर जबाबदारीचा क्षण आहे. ‘लोकमत महाराष्ट्र रत्न’ हा सन्मान माझ्या वैयक्तिक प्रवासाचा नाही,तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या प्रेमाचा आणि त्यांच्या माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे.
आजवरचा माझा सामाजिक-राजकीय प्रवास संघर्षमय होता,पण त्या संघर्षातून मला माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या माझ्यावर असणाऱ्या प्रेमाने मला बळ दिले. माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या लोकविश्वासाच्या जोरावर मी जे काही करू शकलो,त्याला आज लोकमत वृत्तसमूहाने एकप्रकारे मान्यता दिली आहे असे मी मानतो.
हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यांसमोर माझा मतदारसंघ,कार्यकर्ते, सहकारी आणि जनतेची चेहरे उभे राहतात. हा सन्मान त्यांच्या कष्टांना, त्यांच्या स्वप्नांना समर्पित आहे. हा बहुमान मला आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
लंडनमध्ये पुरस्कार स्वीकारताना मी जनतेचा जनसेवक म्हणून उभा होतो,हा सन्मान जनतेच्या चरणी अर्पण करतो”. असे आमदार सुनील कांबळे म्हणाले.

COMMENTS