MLA Sunil Kamble | अभियंता संवर्गातील (स्थापत्य) ७२ उप अभियंता यांना पदोन्नती देतेवेळेस मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण! | सखोल चौकशी करण्याची आमदार सुनील कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Homeadministrative

MLA Sunil Kamble | अभियंता संवर्गातील (स्थापत्य) ७२ उप अभियंता यांना पदोन्नती देतेवेळेस मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण! | सखोल चौकशी करण्याची आमदार सुनील कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule May 29, 2025 7:26 PM

Mhila Aayog Aypa Dari | महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर
BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 
Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 

MLA Sunil Kamble | अभियंता संवर्गातील (स्थापत्य) ७२ उप अभियंता यांना पदोन्नती देतेवेळेस मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण! | सखोल चौकशी करण्याची आमदार सुनील कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका अस्थापनेवरील स्थापत्य अभियंता संवर्गातील ७२ उप अभियंता यांना पदोन्नती देतेवेळेस काही अभियंता यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करून विशेष खात्यामध्ये नेमणूक देण्यात आलेली आहे. असा आरोप भाजपचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble)  यांनी केला आहे.  तसेच मलनि:सारण विभागाकडील ११ गावांचे प्रकल्प कामांसाठी अभियंता नेमणूक करतेवेळेस मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करण्यात आलेली आहे. तरी याबाबत सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी आमदार कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. (PMC Employees Promotion)

महापालिका आयुक्त ७२ शाखा अभियंता (स्थापत्य) यांची उप अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती केलेली आहे. सदरच्या आज्ञापत्रकामध्ये काही शाखा अभियंता ज्या खात्यात काम करत होते त्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती देताना पुन्हा तेच खाते देण्यात आलेले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे कळते. असे आपल्या निवेदनात कांबळे यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

आमदार कांबळे यांनी पुढे म्हटले आहे कि, मलनिःसारण विभागाकडील ११ गावांचे प्रकल्प कामांसाठी  कार्यालयीन आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये दोन उप अभियंता यांना प्रभारी कार्यकारी अभियंता चा पदभार दिलेला आहे. वास्तविक पाहता मलनि:सारण विभागाकडे ५ कार्यकारी अभियंता कार्यरत असतानादेखील दोन उप अभियंता यांना प्रभारी कार्यकारी अभियंता चा पदभार दिलेला आहे. त्यामधील एक अभियंता प्रत्यक्ष उप अभियंता असून सद्यस्थितीत त्यांच्याकडे महापालिका सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार असताना देखील  कार्यालयीन आदेशान्वये त्यांना मलनिःसारण विभागाकडील ११ गावांचे प्रकल्प कामांसाठी उप अभियंता व प्रभारी कार्यकारी अभियंता असे दोन्ही पदभार सोपविण्यात आलेले आहेत. तसेच त्यामधील दोन कनिष्ठ अभियंता पथ विभाग व भवन विभाग कडे काम करीत असून त्यांचीही  कार्यालयीन आदेशान्वये त्यांना मलनिःसारण विभागाकडील ११ गावांचे कामांसाठी नेमणूक करण्यात आलेली आहे.

वरील बाबींचे अवलोकन केले असता उप अभियंता (स्थापत्य) यांना खाती वाटप करताना व मलनिःसारण विभागाकडील ११ गावांचे कामांसाठी अभियंताची नेमणूक करतेवेळेस मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे. यांची सखोल चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करावी व सदरची दोन्ही आज्ञापत्रे तात्काळ सुधारित करून नव्याने काढण्यात यावी. अशी मागणी आमदार कांबळे यांनी केली आहे.