MLA Sunil Kamble | गुलटेकडी च्या धर्तीवर काशेवाडी मधील नवीन एस आर ए प्रकल्प राबवला जावा | आमदार सुनील कांबळे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
Kashewadi SRA – (The Karbhari News Service) – गुलटेकडी येथील स्व. मिना ताई ठाकरे वसाहत येथे होत असलेल्या पुणे मनपाच्या वतीने एस आर ए प्रकल्पाच्या धर्तीवर काशेवाडी मध्ये देखील पुणे मनपा च्या वतीने एस आर ए प्रकल्प राबविण्यात यावा. अशी मागणी आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कांबळे यांच्या पत्रानुसार कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील काशेवाडी भवानी पेठ, तसेच परीसरातील नागरीकांकडुन व स्थानिक पदाधिकाऱ्या कडुन आलेल्या तक्रारी नुसार काशेवाडी भागामध्ये विविध पक्षाचे पुढारी हे नागरिकांना आमिष दाखवून खोटे कारण सांगून त्यांच्याकडून जोर जबरदस्तीने कागद पत्रे जमा करून त्यांचे एस आर ए प्रकल्प करिता संमती घेण्याचे काम अत्यंत युद्ध पातळीवर सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. काही राजकीय पुढाऱ्यांमध्ये संमती मिळवण्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यापैकी कोण जास्त संमती करून देईन त्यांना विविध प्रकारचे भेट व मोबदला देखील देत असल्याचे आमच्या निदर्शनास आहे. तसेच ज्या घरामध्ये तीन कुटुंब राहत आहेत त्या घरामधील एकाच व्यक्तीची संमती घेत असुन काही व्यक्ति त्या ठिकाणी राहण्यास नसून देखील त्यांचे बोगस कागदपत्रे बनवून बेकायदेशीर रित्या आर्थिक स्वार्थासाठी संमती घ्यायचे काम सुरू आहे.
आमदार कांबळे यांनी पुढे म्हटले आहे की, एस आर ए प्रकल्पा बाबत महापालिका प्रशासन कडून कोणत्याही बिल्डर किंवा विकसकास लेखी आदेश देण्यात आले नसून देखील काशेवाडी मधील नागरिकांची फसवणूक करून बेकायदेशीर रित्या संमती घेण्याचे काम परस्पर सुरू आहे. काशेवाडी भागामध्ये अशिक्षिक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची काही राजकीय पुढाऱ्यांच्या कडून फसवणूक होवू नये तसेच नागरिकांना त्यांच्या हक्काचे स्वतःचे घर मिळावे.
राजकीय पुढाऱ्याचा फायदा न होता नागरिकांना योग्य न्याय मिळावा या करिता गुलटेकडी येथील स्व. मिना ताई ठाकरे वसाहत येथे होत असलेल्या पुणे मनपाbच्या वतीने एस आर ए प्रकल्पाच्या धर्तीवर काशेवाडी मध्ये देखील पुणे मनपा च्या वतीने एस आर ए प्रकल्प राबविण्यात यावा. तरी गैर प्रकार तत्काळ थांबवून नागरिकांची होत असलेली दिशाभूल थांबवावी व स्थानिक नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा. असे आमदार कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS