MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी 

HomeपुणेBreaking News

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी 

गणेश मुळे Apr 19, 2024 3:03 PM

Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले
Congress : MNS : Sanjay Jagtap : मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश
MLA Sanjay Jagtap | आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत या मागण्या 

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी

MLA Sanjay Jagtap – (The Karbhari News Service) – पुरंदर हवेली मतदारसंघाच्या (Purandar Haveli Constituency) कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिका हद्दीतील (PMC Pune Limits) समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Water Issue)

आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानुसार  माझ्या कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या, पिसोळी, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवालेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी, जांभुळवाडी व कोळेवाडी, उंड्री, भेकराईनगर, उरूळीदेवाची, फुरसुंगी, आंबेगाव आंबेगाव बु. खुर्द या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने येथील वाड्यावस्त्या, सोसायट्या, गावठाणांचा समावेश झाल्यापासून आजपर्यंत पिण्याच्या पाण्यासह मुलभुत सोयीसुविधांपासून वंचित आहेत.

जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि मागील वर्षी मान्सुनपुर्व व जुन ते सप्टेंबर २०२३ कालावधीत पर्जन्यात तूट निर्माण झाल्याने तसेच वातावरणीय बदलामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. या परिसराला पाणी पुरवठा करणारे टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसराकरीता येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या अथवा फेऱ्या वाढवून याठिकाणी नियमित पाणी पुरवठ्याकरीता योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या बाबींचा सहानुभुतीपुर्वक विचार करून समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.