MLA Hemant Rasane | आमदार हेमंत रासने ‘इन ॲक्शन मोड’, कचरामुक्त कसब्यासाठी भल्या पहाटे मतदारसंघात पाहणी
| स्वच्छ आणि सुंदर कसब्यासाठी पुढील पंधरा दिवसात आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाला सूचना
Kasba Peth Constituency- (The Karbhari News Service) – दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, यामध्ये कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने हे विक्रमी मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच रासने ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत असून कचरामुक्त कसब्याचा निर्धार करत त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत रासने यांनी भल्या पहाटे संपूर्ण मतदारसंघात पाहणी केली. यावेळी पुढील पंधरा दिवसांमध्ये कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. (Pune Municipal Corporation)
हेमंत रासने यांनी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्यासह घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांसोबत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या दूध भट्टी, गणेश पेठ, ताडीगुत्ता, गंज पेठ रोड तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील भिकारदास मारुती चौक आणि रमणबाग प्रशाला या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रासने म्हणाले, “विधानसभा निवडणूक लढत असताना मतदारसंघातील नागरिकांना आपण विकासाचा पंचसूत्री उपक्रम राबवणार असल्याचा शब्द दिला आहे. यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कसबा घडवण्यासाठी विशेष आराखडा तयार करून कार्यवाही केली जाणार असून पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली. कसबा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा असून जगभरातून नागरिक येथे भेट देतात, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे”.
COMMENTS