Maratha Kranti Morcha | वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या मागणीला मराठा क्रांती मोर्चा चा पाठींबा 

HomeBreaking News

Maratha Kranti Morcha | वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या मागणीला मराठा क्रांती मोर्चा चा पाठींबा 

Ganesh Kumar Mule Mar 24, 2025 9:16 PM

Union Buget 2025 | मोदी सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर | सचिन आडेकर
Taradoot : Sarathi : तारादूत सुरु करण्यासाठी मराठा संघटनाचे आंदोलन 
Santosh Deshmukh Case | दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकार मधून बाहेर पडावे | मराठा क्रांती मोर्चा ची मागणी

Maratha Kranti Morcha | वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या मागणीला मराठा क्रांती मोर्चा चा पाठींबा

 

Raigad Fort Dog Statue – (The Karbhari News Service) – कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे युवराज संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी पत्र लिहून मागणी केली. या मागणीला मराठा क्रांती मोर्चा पुणे (Maratha Kranti Morcha Pune) ने पाठींबा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चा ने पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. (Maharashtra News)

याबाबत मराठा क्रांती मोर्चा पुणे शहरचे  समन्वयक सचिन आडेकर यान सांगितले कि, श्रीमान रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरील हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे. मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर यांचा या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  फडणवीस साहेब याची नक्कीच दखल घेतील अशी आम्हाला आशा आहे. मुळातच 1938 साली या वाघ्या कुत्र्याचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर खोडसाळ पणे बसवण्यात आला आहे. इतिहासामध्ये कुठेही या वाघ्या कुत्र्याचे संदर्भ नाहीत. त्यामुळे सदर पुतळा त्वरित हटवावा अशी आमची मागणी आहे. असे आडेकर म्हणाले.