Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची 20 नोव्हेंबर ला पुण्यात सभा
Manoj Jarange Patil | मराठा समाजास (Maratha Samaj) ओ.बी.सी. प्रवर्गातून (OBC) ५०% चे आतमधील आरक्षण मागणीची माहिती देणे तसेच समाजबांधवांच्या गाठीभेटी दौऱ्यात खराडी, ता. हवेली, जि. पुणे येथे २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे जिल्हा सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj Pune) वतीने देण्यात आली. (Manoj Jarange Patil News)
या सभेसाठी मराठा संघर्षयौद्धा मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहून समाजबांधवांना संबोधित करणार आहेत. पुणे जिल्हयातील खेड राजगुरूनगर, बारामती, इंदापूर येथे राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याच्या
सभेनंतर जरांगे पाटील हे खराडी येथे येऊन प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरी तसेच नजिकच्या ग्रामीण भागातील समाज बांधवांचे मागणीनुसार खराडी येथे सभा घेणार आहेत.
सभेनंतर जरांगे पाटील हे खराडी येथे येऊन प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरी तसेच नजिकच्या ग्रामीण भागातील समाज बांधवांचे मागणीनुसार खराडी येथे सभा घेणार आहेत.
या सभेचे नियोजन महालक्ष्मी लॉन्स, पुणे नगर रोड, खराडी येथे खराडी, वाघोली, चंदननगर, लोणीकंद, हडपसर, पुणे, पिंपरी चिंचवड येथील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, विविध मराठा संघटना यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ मंडळे यांचेकडून करण्यात येत आहे.
या सभेसाठी सुमारे एक लाख समाज बांधव उपस्थित राहतील. यासाठी मोकळया जागेत स्टेज, बसणेची व्यवस्था, पार्किंग, पाणी, फिरती स्वच्छता गृहे, तातडीची आरोग्य सेवा इ. प्रकारची सुविधा त्या ठिकाणी करण्याचे आयोजन चालू आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, महिला, पुरुष समाजबांधवांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.