फायझरची एमआरएनए लस उपलब्ध करून द्या
माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे – कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यासाठी फायद्याची एमआरएनए ही लस तातडीने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविलेल्या पत्रात जोशी यांनी म्हटले आहे की, भारतातील साठ वर्षे वयावरील अनेक ज्येष्ठ नागरिक गेल्या वर्षभरात आपली मुले वा नातेवाईक यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी फायझर कंपनीच्या एमआरएनए लसीचे दोन डोस घेतले आहेत. अमेरिकेत गेलेल्यांपैकी जे लोकं भारतात परत आले आहेत त्यांना आता तिसरा डोस घ्यावयाचा आहे. त्यांच्यापैकी ज्यांना रक्तदाब, डायबिटीस याचा आजार आहे त्यांच्यासाठी फायझरची लस उपलब्ध नाही. कोविन ॲपवर कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक अशा तीनच लस उपलब्ध असल्याचे दाखवले जाते. आपण या मागणीचा विचार करुन फायझर लस उपलब्ध करुन द्यावी.
COMMENTS