Mahesh Pokale | सिंहगड रोड परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या | शिवसेना नेते महेश पोकळे यांची मागणी
Pune News – (The Karbhari News Service) – पुण्यात आलेल्या महापुराचा फटका सिंहगड रोडवरील नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या. अशी मागणी ठाकरे गटाचे नेते महेश पोकळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
पोकळे यांच्या निवेदनानुसार 2५ जुलै २०२४ रोजी संपूर्ण पुणे शहराला पावसाने झोडपले. विशेष करून सिंहगड रोडवरील सामान्य नागरिक व व्यापारी यांना याचा खूप फटका बसला. कोणाचे घरातील साहित्याचे नुकसान झाले तर कोणाच्या दुकानातील संपूर्ण साहित्य पाण्यामुळे वाहून गेले. सामान्य लोकांच्या नशिबात नेहमीच संघर्ष येतो. मात्र राज्य सरकारने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे पोकळे यांनी म्हटले आहे.