Mahavitran | MSEDCL | महावितरणच्या उदासीन कामकाजाचा नागरिकांना ‘शॉक’
| महावितरण ची बिलं मिळाली नसल्याने नागरिक हैराण
Mahavitran | MSEDCL | महावितरण च्या उदासीन कामकाजाचा शॉक नागरिकांना लागत आहे. मे महिन्याची नागरिकांना अजून बिले (Light Bill) मिळाली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बिले भरली नाहीत. तर दुसरीकडे बिल भरले नाही म्हणून महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम केले आहे. या कारभारामुळे नागरिक हैराण आहेत. (Mahavitran News)
| महावितरण च्या एजेन्सी बदलाचा नागरिकांना फटका
महावितरण कडून नागरिकांना दर महिन्याला प्रिंटेड बिले पाठवली जातात. त्यानुसार नागरिकांकडून बिलांचा भरणा केला जातो. बिल उशिरा भरले तर दंड असतो आणि नाहीच भरले तर वीज कनेक्शन तोडले जाते. म्हणून नागरिक वीज बिल भरण्याची घाई करत असतात. वाकडेवाडी, शिवाजीनगर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले कि, मात्र जून महिन्याची 15 तारीख आली तरी मे महिन्याचे बिल अजूनही नागरिकांना मिळाले नाही. नेहमी महिन्याच्या सुरुवातीला बिल येत असते. बिल आले नसल्याने आम्ही बिल भरण्याचे विसरून गेलो. त्याचा फटका तात्काळ बसला. आमचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. दुसऱ्या एका नागरिकांना सांगितले कि वीज कनेक्शन तोडताना आम्ही कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वीज बिल भरल्याची पावती दाखवत होतो. त्यांनी आमचे न ऐकता आम्हांला महावितरणच्या मुख्य कार्यालयात जा म्हणून सांगितले.
नागरीकांच्या या तक्रारी घेऊन आम्ही जेव्हा याबाबत महावितरण च्या अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा सांगण्यात आले कि बिलाच्या कामाची एजेन्सी बदलली असल्याने हा गोंधळ झाला आहे. लवकरच बिले पाठवण्यात येतील.
—
News title | Mahavitran | ‘Shock’ to the citizens of the depressed functioning of Mahavitran