Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले एकूण १० निर्णय जाणून घ्या 

Homeadministrative

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले एकूण १० निर्णय जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule May 27, 2025 6:59 PM

Residence to Ministers | राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप
Nominated Members | महापालिकांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारित करण्याचा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील १० संक्षिप्त निर्णय जाणून घ्या 

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले एकूण १० निर्णय जाणून घ्या

 

Cabinet Meeting Maharashtra – (The Karbhari News Service) – मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. यात विविध निर्णय घेण्यात आले. हे निर्णय जाणून घेऊया.

 

• रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग)

• शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.(विधि व न्याय विभाग)

* इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला ६५७ कोटी , जालन्याला ३९२ कोटी पाच वर्षांत मिळणार (वित्त विभाग)

* शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ. (महसूल विभाग)

* पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमीनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. (महसूल विभाग)

• फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (FDCM Ltd.) मधील १हजार ३५१ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी (वने विभाग )

• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता. (शालेय शिक्षण विभाग)

• अशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार. (पणन विभाग)

• कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात “उप कृषि अधिकारी” व “सहायक कृषि अधिकारी” असा बदल (कृषि विभाग )

• महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर (वस्त्रोद्योग विभाग)