Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या!

Homeadministrative

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या!

Ganesh Kumar Mule Oct 14, 2024 1:38 PM

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ५ निर्णय 
Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
Cabinet Meeting Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या!

 

 

Maharashtra News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. (Maharashtra Cabinet Meeting)

| मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

✅आगरी समाजासाठी महामंडळ

✅समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

✅दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

✅आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

✅वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

✅राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

✅पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

✅खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

✅राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

✅पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

✅किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता

✅अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

✅मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

✅खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

✅मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

✅अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

✅‘उमेद’साठी अभ्यासगट

✅कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0