Mahametro Contract Employees ESIC | महामेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आता ESIC चा लाभ

Homeadministrative

Mahametro Contract Employees ESIC | महामेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आता ESIC चा लाभ

Ganesh Kumar Mule Mar 11, 2025 6:25 PM

Pune Municipal Corporation Deposit | पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटीच्या ठेवी असताना भरमसाठ व्याजदराने ५३० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी ?
Pandharpur Aashadhi wari | पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’
MLA Chetan Tupe | पुणे मनपा तील भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई कधी? | आमदार चेतन तुपे यांनी सरकारला धरले धारेवर

Mahametro Contract Employees ESIC | महामेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आता ESIC चा लाभ

 

Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – महामेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आज कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ऑफिस बिबवेवाडी येथे संयुक्त निदेशक सुकांता दास, उप निदेशक राजेश सिंग, ESIC बोर्डाचे संचालक सदस्य कामगार नेते सुनील शिंदे, सहाय्यक संचालक सुजाता अगस्ती, सहाय्यक शाखा व्यवस्थापक भावना पाटील, अधीक्षक रोमिला सिंग, राजदीप व्यवस्थापनाचे मनोज रसाळ यांच्या उपस्थितीत ESIC कार्ड वाटप करण्यात आले. (Pune News)

यावेळी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ऑफिस बिबवेवाडी येथे संयुक्त निदेशक सुकांता दास यांनी उपस्थित कर्मचऱ्यांना ESIC द्वारे वैद्यकीय लाभ, आजारपणाचा लाभ, तात्पुरता व कायम अपंगत्व लाभ, मातृत्व लाभ, अंत्यविधी लाभ अशा विविध कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाबाबत अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली.

ESIC बोर्डाचे संचालक सदस्य कामगार नेते सुनील शिंदे यांनी दवाखान्या संदर्भातील कुठल्याही प्रकारची अडीअडचणी साठी सदैव 24 तास फोन उपलब्ध असण्याबाबत माहिती दिली. तसेच उप निदेशक राजेश सिंग यांनी सतत गेली 16 वर्ष ESIC चे सदस्य म्हणून कामगार नेते सुनील शिंदे यांनी करत असलेल्या कामाबाबत माहिती देत कामगारांना ESIC लाभ मिळविण्याच्या प्रकीये बाबत माहिती दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: