Madhuri Misal on GBS | गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काय दिले निर्देश!

Homeadministrative

Madhuri Misal on GBS | गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काय दिले निर्देश!

Ganesh Kumar Mule Jan 28, 2025 8:27 PM

GB Syndrome Pune PMC | GBS आजारासंदर्भात महत्वाचे निर्णय | जाणून घ्या काय घेतले निर्णय!
GB Syndrome | विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जीबी सिंड्रोम आजाराच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा
GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 

Madhuri Misal on GBS | गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काय दिले निर्देश!

 

GBS in Pune – (The Karbhari News Service) – पुण्यातील काही भागांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS)या आजाराचे रुग्ण आढळले असून पुण्यातील खडकवासला, नांदेड सिटी नांदेड गाव ,किरकटवाडी या परिसरामध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.दूषित पाण्यामुळे या रोगाची लागन झाली असल्याचे प्राथमिक अहवालात दिसून येत आहे. शासकीय दवाखाना मध्ये या आजाराच्या उपचार साठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे. या संदर्भात राज्य शासनाचा आरोग्य विभाग व महापालिकेतील आरोग्य यंत्रणा यांनी आपापसात समन्वय साधन्याचे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. (Pune News)

गुलेन बेरी सिंड्रोम च्या उपचारासाठी पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय सज्ज असुन वैद्यकीय सहाय्यता निधीची मर्यादा एक लाखाहून दोन लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे आणि पुणे महानगरपालिकेने याबाबत नोडल अधिकारी यांची नेमणूक केली असल्याची माहिती राज्यमंत्री यानी दिली. या सोबतच पुणे महानगरपालिकेने जवळपास 65 हजार घरांच्या सर्वेक्षण पूर्ण केले असुन IVIG इंजेक्शन ची उपलब्धता करण्यात आली असुन याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पानी उकलून प्यावे असे आवाहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0