Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा 

HomeBreaking Newsपुणे

Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा 

कारभारी वृत्तसेवा Oct 27, 2023 3:09 PM

Changes in transport | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल
Water Closure | सिंहगड रोड, हडपसर परिसरात गुरुवारी पाणी बंद! 
PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका  | पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या 

Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा

Lord Shri Rama Statue |  पुणे : हडपसर (Hadapsar) परिसरातील हांडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा 9 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्य सभेने (PMC General Body) मंजुरी दिल्यानंतर तो अभिप्रायासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्यानंतर महापालिकेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. दरम्यान ही मूर्ती आणि त्याचा चौथरा बनवण्याचे काम महापालिकेचे ठेकेदार विश्वास मणेरे (Vishwas Manere) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये रामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी महापालिकेला २०१८ मध्ये दिला होता. या खर्चाला महापालिकेने मान्यता द्यावी, असे या प्रस्तावात भानगिरे यांनी नमूद केले होते. महंमदवाडी- कौसरबागमधील हांडेवाडी येथे हा पुतळा उभारण्याचे नियोजित होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारावयाचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला होता.

प्रमोद नाना भानगिरे यांचा पाठपुरावा

प्रमोद नाना भानगिरे हे शिवसेना शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याबाबत महापालिकेला कळविण्यात आल्यानंतर महापालिकेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

| विश्वास मणेरे यांनी बनवली मूर्ती

दरम्यान ही मूर्ती आणि चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम ठेकेदार विश्वास मणेरे यांनी केले आहे. ही मूर्ती 9 फूट उंच असून यासाठी फायबर मटेरियल एस एस चे स्टील वापरण्यात आले आहे. मूर्तीच्या पाटाची साईज 5 फूट *3 फूट आहे. तर मूर्तीचे वजन अंदाजे 650 कि. असणार आहे. अशी माहिती विश्वास मणेरे यांनी दिली.