Local Body Elections  | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक | आता २५ फेब्रुवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी!

Homeadministrative

Local Body Elections | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक | आता २५ फेब्रुवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी!

Ganesh Kumar Mule Jan 28, 2025 5:24 PM

Vidhansabha Election | विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) १ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर
MPSC Time Table | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Maratha Samaj Survey | मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

Local Body Elections  | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक | आता २५ फेब्रुवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी!

 

Supreme Court – (The Karbhari News Service) – जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र आज देखील सुनावणी होऊ शकली नाही. सुप्रीम कोर्टाने नवीन तारीख दिली असून आता ही सुनावणी २५ फेब्रुवारी ला होणार आहे. (Municipal Elections)

सर्वाच्च न्यायालयात (Supreme Court) आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पुन्हा एका तारीख पे तारीख पाहायला मिळाली आहे. राज्य सरकारच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

त्यामुळे, आणखी जवळपास एक महिन्यानंतर ही सुनावणी होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) पुढे ढकलण्यात आल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, दुसरीकडे राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा देखील केली आहे. मात्र, अजून काही काळ सर्वांनाच वाट पाहावी लागेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0