Lalit Kala Kendra Pune | ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख व दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करा | प्रमोद नाना भानगिरे यांची कुलगुरूंकडे मागणी

HomeBreaking Newsपुणे

Lalit Kala Kendra Pune | ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख व दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करा | प्रमोद नाना भानगिरे यांची कुलगुरूंकडे मागणी

गणेश मुळे Feb 03, 2024 12:25 PM

PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार
Pune Gangadham Road Accident | गंगाधाम रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांनवर तत्काळ निर्बंध घाला – प्रमोद नाना भानगिरे
1900 transfer employees of PMPML will join permanent service..!! 

Lalit Kala Kendra Pune | ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख व दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करा | प्रमोद नाना भानगिरे यांची कुलगुरूंकडे मागणी

Lalit Kala Kendra Pune | ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख व दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख  प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरूंकडे केली आहे. (Pune News)

भानगिरे यांच्या पत्रानुसार  2 फेब्रुवारी या दिवशी ललित कला केंद्र येथील ओपन थेटर मध्ये काही नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. यातील तिसरे नाटके प्रभू श्री रामचंद्र व सीतामाता यांच्यावर आधारित होते. संबंधित नाटकामध्ये माता सीतेचे पात्र स्टेजवरून अश्लील भाषेत शिव्या देत होते. त्याचबरोबर विद्यापीठासारख्या शिक्षणाच्या प्रांगणामध्ये सार्वजनिक ठिकाणी व एका जाहीर नाटकाच्या प्रयोगामध्ये सीता मातेचे पात्र सिगरेट ओढत होते. नंतर सीता मातेचे पात्र प्रभू श्रीरामचंद्र यांना राखी सावंत नावाने हाक मारते. या सर्व विषयांमध्ये हिंदू देवी देवता यांचा अपमान झालेला आहे. यावेळी सामान्य विद्यार्थी व कार्यकर्ते या नाटकाच्या प्रसंगांबद्दल शांततेच्या मार्गाने आवाज उठवत असताना ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी नाटकाबद्दल आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना कुदळ फावडे व दांडूक यांनी मारहाण केली. ही सर्व घटना निंदनीय आहे. याचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्राविण भोळे, आक्षेपार्ह नाटक लिहिणारे व सादर करणारे विद्यार्थी आणि ललित कला केंद्राचे मारहाण करणारे विद्यार्थी यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. त्याचबरोबर सर्व दोषींना तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.