Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

HomeपुणेBreaking News

Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

कारभारी वृत्तसेवा Dec 11, 2023 5:50 AM

PMC Retired Employees – महापालिका सहायक आयुक्त सुनिल मते, प्रकाश मोहिते यांच्यासहित ४० कर्मचारी सेवानिवृत्त!
पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे
PMC Pune | राजेंद्र मुठे यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे 

Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

 

Kunbi-Maratha Reservation | PMC | राज्यभरात मराठा-कुणबी नोंदी (Maratha-kunbi Registration) घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदी ची देखील माहिती घेतली जाणार आहे. १९६७ पूर्वीचे महापालिका अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक / सेवा अभिलेख तपासणी करून त्याआधारे प्राप्त नोंदी कळविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिले आहेत. दरम्यान महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या नोंदीची देखील माहिती घेतली जात आहे. (Kunbi-Maratha Reservation | PMC)

शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देणेबाबत मा.न्यायमूर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेत आलेली आहे.
या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. दरम्यान या नोंदी  बाबत  तपासणीची कार्यवाही सुरु करणेचे अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी यांचे स्तरावर समन्वय कक्ष/विशेष कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करून त्याबाबत अहवाल सादर करणेबाबत सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेमधील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्ताकांची अभिलेख तपासून त्याआधारे नोंदीबाबतची माहिती सादर करणेबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करणेबाबत एक समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. संजयकुमार राठोड, प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग यांची याकामी नेमणूक करण्यात आली आहे.  राठोड यांनी  ज्योती कदम, निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून कामकाज पहावयाचे आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

तर दुसरीकडे महापालिका शाळांतील (PMC Pune Schools) विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. हे काम देखील प्रशासकीय अधिकारी राठोड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.