koyta  Gang Pune | वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत | खासदार सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

HomeपुणेBreaking News

koyta Gang Pune | वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत | खासदार सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

Ganesh Kumar Mule Jun 19, 2023 7:58 AM

Puskatduot Scheme of Yashwantrao Chavan Centre | आता स्वतंत्र वेबसाईटवर केवळ पोस्टल खर्चात पुस्तक मागवणे झाले आता आणखी सोपे | यशवंतराव चव्हाण सेंटरची पुस्तकदूत योजना
MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा
Navale Bridge Accident | नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांची एकत्रित बैठक बोलवा | खासदार सुळे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

koyta  Gang Pune | वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत | खासदार सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

|  राज्याच्या गृहमंत्र्यानी लक्ष घालण्याची मागणी

Koyta Gang Pune | पुण्यामध्ये (Pune city) पुन्हा एकदा कोयता गँग (Koyta Gang) कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार (Criminal’s) दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. (Koyta Gang Pune)
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. (Koyta Gang Pune News)
पुणे आणि परिसरात वाढलेल्या या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे असून संघटीत गु्न्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Pune News)
—-
News Title | Koyta Gang Pune |  Resurgence of Koyta Gang in Warje area  MP Sule’s discussion with Police Commissioner