Kothrud Ward Office | पावसाळी तयारीसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन बैठक

Homeadministrative

Kothrud Ward Office | पावसाळी तयारीसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन बैठक

Ganesh Kumar Mule May 21, 2025 9:21 AM

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे
Dilip Vede Patil | वन उद्यानाचा वीज पुरवठा सुरळीत | नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पुढाकाराने प्रशासनाचा गलथान कारभार उघड
Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 

Kothrud Ward Office | पावसाळी तयारीसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन बैठक

Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूड वॉर्ड ऑफिस येथे पावसाळी कामांची तयारी, नालेसफाई, चेंबर स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. (Pune Municipal Corporation- PMC)

या बैठकीस कोथरूड महापालिकेचे सहायक आयुक्त मा. विजय नायकल, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने, उपायुक्त (परिमंडळ २) अविनाश सपकाळ, ड्रेनेज विभागाचे श्री. गोजारे व पावरा , आरोग्य, पथ, अग्निशमन व पोलीस विभागांचे अधिकारी आणि इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी कोथरूड – बावधन परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष ठामपणे वेधले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिक त्रस्त असून, नाले व चेंबर साफसफाईच्या कामात झालेल्या हलगर्जीपणाची उदाहरणे त्यांनी मांडली.

त्यांनी स्वतःच्या मोबाईलमधील प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्स दाखवून संबंधित ठिकाणी आजही नाले तुंबलेले आहेत हे दाखवून दिले.
या चर्चेदरम्यान, प्रशासनाने काही ठिकाणी चुकीची माहिती दिल्याचे उघडकीस आले, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.

या व्हिडीओ क्लिप्स पाहिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की,

> “मी स्वतः व्हिडीओमध्ये दाखवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करीन. परिस्थिती पाहून आवश्यक ती कारवाई तात्काळ केली जाईल. प्रशासन, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी मिळून समन्वयाने काम करतील. नागरिकांना कुठलीही मदत लागल्यास प्रशासन तत्काळ प्रतिसाद देईल.”

नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की,

“महानगरपालिकेच्या यंत्रणेसोबतच माझी वैयक्तिक यंत्रणा कोथरूड – बावधन परिसरातील नागरिकांसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.
स्वतंत्र मनुष्यबळ, यंत्रसामग्री व आपत्कालीन प्रतिसादासाठी माझ्या पातळीवर आवश्यक ती तयारी पूर्ण आहे.
आणि आज मी जाहीर करतो की, माझ्या प्रभागातील कोणत्याही नागरिकास अडचण आली, तर ‘एक कॉल करा – तुमचा प्रॉब्लेम सॉल करतो!'”
या प्रसंगी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की,

“नागरिकांचे हक्क, त्यांचा आवाज आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी नेहमीच लढा दिला आहे आणि पुढेही देत राहणार आहे.
कोणीही अडचणीत असेल, तर त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा — मी आणि माझी टीम तत्काळ मदतीसाठी हजर राहील.”