Kothrud MLA Chandrakant Patil | नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा!  |  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

HomeBreaking Newsपुणे

Kothrud MLA Chandrakant Patil | नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

गणेश मुळे Jun 08, 2024 8:47 AM

PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त
Murlidhar Mohol on Pune Potholes | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ३० टीम तयार करून शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा  | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश
PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार! | महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

Kothrud MLA Chandrakant Patil | नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा!

|  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

| चंद्रकांत पाटील यांच्याकडून मतदारसंघातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा

Kothrud Vidhansabha Constituency – (The Karbhari News Service) – कोथरूड मतदारसंघातील औंध, बाणेर, बावधन भागातील पावसाळापूर्व कामांचा आढावा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. पावसाळा पूर्व कामांतील नालेसफाईची आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना आज नामदार पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. (Kothrud Bandhan Ward office)

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिःसारण विभागाचे अधिक्षक अभियंता दिनकर गोजरे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, उपायुक्त परिमंडळ क्रमांक.२ चे उपायुक्त गणेश सोनूने, बाणेर- औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, कोथरूड-बावधनचे सहाय्यक आयुक्त केदार वझे, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह महापालिकेच्या विविध खात्याचे अधिकारी तसेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे पाटील, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अल्पना वर्पे, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, भाजपा नेते दिनेश माथवड, राहुल कोकाटे उपस्थित होते. (Pune Municipal Corporation (PMC)

या बैठकीत नामदार पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील बाणेर-औंध क्षेत्रीय कार्यालय आणि कोथरुड- बावधन क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.‌

नाले साफ सफाई संदर्भात अपूर्ण असलेल्या ठिकाणी कामे करून घेण्यात यावी. तसेच, आवश्यकता असलेल्या ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यासोबतच पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणची पाहाणी करून योग्य ती उपययोजना कराव्यात आदी सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.

तसेच, महापालिकेच्या वतीने अनेक भागात पिण्याच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदाई करण्यात आली आहे. मात्र त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आदी सूचना दिल्या.

त्यासोबतच पथ दिव्यांची देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. याशिवाय धोकादायक झाडांच्या फांद्यांची वेळीच छाटणी करुन, कचरा उचलण्यात यावा. तसेच, पदपथ तथा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करुन, अतिक्रमणमुक्त पदपथ करावेत, आदी सूचना देखील या बैठकीत दिल्या.