Kondhwa Dafanbhumi | Pramod Nana Bhangire | कोंढव्यातील दफन भूमीच्या निर्णयावरून प्रमोद नाना भानगिरे यांचा आंदोलनाचा इशारा! 

HomeपुणेBreaking News

Kondhwa Dafanbhumi | Pramod Nana Bhangire | कोंढव्यातील दफन भूमीच्या निर्णयावरून प्रमोद नाना भानगिरे यांचा आंदोलनाचा इशारा! 

कारभारी वृत्तसेवा Dec 27, 2023 2:10 PM

Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 
PMC Pune Employees | 23 समाविष्ट गावापैकी 8 गावांतील 76 कर्मचार्‍यांना महापालिका वेतनश्रेणी लागू
Lack of DP Impediments in Development of Villages Included in the PMC | MP Supriya Sule 

Kondhwa Dafanbhumi | Pramod Nana Bhangire | कोंढव्यातील दफन भूमीच्या निर्णयावरून प्रमोद नाना भानगिरे यांचा आंदोलनाचा इशारा!

Kondhwa Dafanbhumi | Pramod Nana Bhangire |  कोंढव्यातील सर्वे नं 44 (Survey No 44 Kondhwa) या भागात दफन भूमी केली जाणार आहे. मात्र या निर्णयाचा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी विरोध केला आहे. हा निर्णय मागे नाही घेतला तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी महापालिका प्रशासनाला (PMC Pune) दिला आहे. (Pramod Nana Bhangire Shivsena Pune)

भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार कोंढव्यातील साधारणतः १० ते १५ हजार हिंदू लोकवस्ती असलेल्या सर्वे नं ४४ या भागात, लहान मुलांच्या खेळासाठी असलेले फुटबॉलच्या मैदानासाठी महानगरपालिकेने ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे संबंधित ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर सद्यस्थितीला या मैदानावर दफनभूमी होत आहे. (Pune Municipal Corporation)

भानगिरे यांनी म्हटले आहे कि, मात्र हा परिसर लोकवस्तीचा असल्यामुळे, कायद्यानुसार भर लोकवस्तीत दफनभूमी करता येत नाही. दफनभूमी करण्यास आमचा कोणताही विरोध नाही. त्यामुळे दफनभूमी ही लोकवस्तीच्या बाहेर असावी, हे सर्वज्ञात असताना देखील, या दफनभूमीस ज्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. याचसोबत येत्या आठ दिवसांत फुटबॉल मैदानावर होऊ पाहणाऱ्या दफन भूमीचा निर्णय मागे घेण्यात यावा. अथवा आम्ही संविधानिक मार्गाने शिवसेना स्टाईलने पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करू. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास यास सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.