Kiosk Facility in PMC | पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा! 

Homeadministrative

Kiosk Facility in PMC | पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा! 

Ganesh Kumar Mule Jan 26, 2025 2:01 PM

Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले
TDR Disbursement Process | PMC | TDR खर्ची करण्याचे कार्यपध्दतीत बदल करण्याची माजी नगरसेवकांची मागणी
 Action of Pune Municipal Corporation (PMC) on unauthorized building in Hill Top Hill Slope in Bibvewadi

Kiosk Facility in PMC | पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात (PMC Visitor Centre) किओस्कची सुविधा (Kiosk Facility) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या किओस्क सुविधेचे व शहर अभियंता अभ्यागत कक्षाचे उद्घाटन  डॉ. राजेन्द्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS), महापालिका आयुक्त यांचे हस्ते आज रोजी शहर अभियंता कार्यालयाच्या प्रवेश दालनात करण्यात आले. अशी माहिती शहर अभियंता कार्यालयाच्या (PMC City Engineer office) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व शासकीय संस्थांना दिले आहेत. त्यानुसार शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय, सौंदर्याकरण व तदनुषंगिक कामे करावयाची आहेत. त्यानुसार शहर अभियंता पुणे महानगरपालिका कार्यालयाने त्या अंतर्गत येणाऱ्या विकास योजना व बांधकाम परवानगी विभाग याबाबत नागरिकांना विविध सेवाबाबत माहिती व्हावी व तसेच या सेवासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून नव्याने तयार केलेल्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

किओस्कच्या माध्यमातून शहर अभियंता विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा जसे वैयक्तिक भोगवटा पत्र देणे, विकास आराखडा झोर्निंग, विकास आराखड्याचा भाग नकाशा, गुंठेवारी, इमारत बांधकाम मान्यता, लेआऊट मान्यता, टीडीआर मान्यता, एअर फोर्स न हरकत दाखला प्रक्रिया इत्यादी बाबत कागदपत्रांची माहिती क्यू आर कोड च्या मार्फत नागरिकांना उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच भविष्यातील विविध सेवा व उपक्रम यांची माहिती टप्याटप्यात उपलब्ध करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0