Kasba Assembly Constituency | कसबा मतदारसंघात अपघाती आमदार आला आणि त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

HomeBreaking News

Kasba Assembly Constituency | कसबा मतदारसंघात अपघाती आमदार आला आणि त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ganesh Kumar Mule Nov 15, 2024 9:57 PM

Pune Airport’s new integrated terminal building inaugurated by Prime Minister Narendra Modi online
Devendra Fadnavis | MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Zero Tolerance | Devendra Fadnavis | राज्यात अमली पदार्थ विरोधात शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kasba Assembly Constituency | कसबा मतदारसंघात अपघाती आमदार आला आणि त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadnavis- (The Karbhari News Service) – कसबा मतदारसंघात महायुती उमेदवार हेमंत रासने यांचे कौतुक केले पाहिजे कारण त्यांनी जनतेचे समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे. देशात एक ‘ अपघाती मुख्यमंत्री ‘ चित्रपट तयार झाला होता की, तशाप्रकारे याठिकाणी विरोधी पक्षाचा एक अपघाती आमदार पोटनिवडणूक मध्ये विजयी झाला. पण त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला आहे. मात्र, रासने यांनी पराभव झाल्यावर घरी नैराश्याने न बसता दुसऱ्या दिवसापासून जनतेत जाऊन काम सुरू केले. काँग्रेसने लोकसभा निवडणूक प्रमाणे उलेमा यांच्या पाय चाटणे काम सुरू केले आणि त्यांनी १७ अटी टाकल्या असून अल्पसंख्याक समुदायाचे लांगूलचालन करण्याचे काम आघाडी करत आहे. व्होट जिहाद प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी मागणी ते करत असून त्यांचा बाप देखील संघावर बंदी घालू शकत नाही. व्होट जिहाद ते करत असतील तर आपल्याला मताचे जिहाद सुरू करायचे, आहे कारण पुढील पिढीच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. (Kasba Peth Élection)

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, हेमंत रासने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट, संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, मनीषा लडकत, उदय लेले उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, कसबा नाव घेतल्यावर स्व. गिरीश बापट यांची आठवण होते. त्यांनी अनेक वर्ष या मतदासंघातील नेतृत्व केले आणि संसदेत गेले. त्यांनतर मुक्ता टिळक यांनी देखील घराण्याचा वारसा चांगला चालवला. केंद्र सरकार मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून पुण्यात गतीने विकास झाला. कसबा मध्ये भूमिगत मेट्रो तयार झाली असून मेट्रोचे शहरात विस्तारीकरण झाले. आधी बस व्यवस्था योग्य नव्हती पण आम्ही वातानुकूलित 1500 इलेक्ट्रिक बस मोठ्या प्रमाणात शहरात सुरू केल्या. पुण्याचे ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यासाठी एआय मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहे. पुण्यात येणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोडला चालना दिली गेली. प्रत्येक रस्त्यावर डबल डेकर रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 54 हजार कोटी रुपये दिले आहे. नदी प्रकल्प सुशोभीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. नदी पात्रात केवळ निर्मळ पाणी राहील नदीत जाणारे सर्व पाणी सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यात येईल. पुण्यासाठी आणखी एक विमानतळ देण्यात येणार आहे. पुण्यात नवीन एसआरए नियमावली करण्यात आली. जुने वाडे पुनर्विकासात करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.

राज्यात आम्ही ११ लाख लखपती दीदी बनवल्या असून सन २०२५ मध्ये २५ लाख लखपती दीदी बनवू. लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींच्या जन्माचे स्वागत सुरू केले. उच्च शिक्षणासाठी मोठी फी आकारली जाते पण राज्य सरकारने मध्यम वर्ग आर्थिक स्थिती मजबुरीमुळे फी भरू शकत नाही त्या मुलींना आम्ही शिक्षणासाठी मदत देऊ केली. एसटी मध्ये आम्ही महिलांना अर्धे तिकीट सुरू केले त्यामुळे तोट्यात असलेली एसटी नफ्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना पैसे देण्याचा निर्णय घेतला पण विरोधक यांच्या नाकावर टिच्चून आम्ही साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. मात्र, काही सावत्र भाऊ न्यायालयात गेले आणि विरोधात योजना बंद करण्यासाठी याचिका टाकली पण आम्ही ठोस भूमिका मांडली. नवे सरकार आल्यावर महिलांना २१०० रुपये दर महिना दिले जातील. भावांसाठी देखील आम्ही कौशल्य आणि भत्ता योजना सुरू केली आहे.

हेमंत रासने म्हणाले, भूमिगत मेट्रो व्यवस्था झाल्यामुळे नागरिकांचे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुक कोंडी सुटेल. याभागात मोठी वाहने आली नाही पाहिजे यादृष्टीने उपाययोजना झाली तर वाहतूक सुरळीत होऊ शकेल. राजकारण मध्ये पोटनिवडणूक मध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत असते. मागील 18 महिन्यात मी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन समजासाठी झटलो आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेटून 50 हजार नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहे. मागील वेळी दीपक मानकर त्याबाजुला होते यंदा ते आपल्याकडे असल्याने विजय सुकर होईल. कसबा हा ट्रॅफिक मुक्त, वाहतूक कोंडी मुक्त आणि स्वच्छ करण्याचा माझा संकल्प आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0