Kamla Nehru Hospital Pune | मेडिकल कॉलेज च्या अनुषंगाने कमला नेहरू हॉस्पिटल केले जाणार सुसज्ज आणि अत्याधुनिक!
| साडे चौदा कोटींची रक्कम उपलब्ध करण्याला मुख्य सभेची मान्यता
Pune PMC News – (The Karbhari News Service) – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने कमला नेहरू हॉस्पिटल सुसज्ज व अत्याधुनिक केले जाणार आहे. या कामासाठी आगामी अंदाजपत्रकात साडे चौदा कोटींची तरतूद उपलब्ध केली जाणार आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चाचे दायित्व स्विकारण्यासाठी ७२ (ब) नुसार भवन विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याला नुकतीच मुख्य सभेने मान्यता दिली आहे. (PMC Medical College)
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अंदाज पत्रकामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अनुषंगाने हॉस्पिटल इमारत बांधणेसाठी २ कोटी इतकी तरतूद उपलब्ध झालेली आहे. महापालिका आयुक्त यांनी कमला नेहरू हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष जागा पाहणी केली असता पाहणी दरम्यान कमला रुग्णालय येथे स्थापत्य विषयक कामे करून हॉस्पिटल हे अत्याधुनिक व सुसज्ज करणे बाबत आदेश दिलेले आहेत. महापालिका आयुक्त यांनी पाहणी दरम्यान कमला नेहरू हॉस्पिटल सुसज्ज व अत्याधुनिक करणे करिता सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा विकसित करून इमारतींचे फेरनियोजन व इंटेरियर डिझाईन करणे बाबत आदेश दिलेले आहे.
त्यानुसार नव्याने रिसेप्शन व एन्टरन्स एरिया विकसित करणे, कॅज्युलीटी वार्ड नव्याने विकसित करणे, पेडीयाट्रिक वार्ड करणे, NICU नवजात बालकासाठी अतिदक्षता विभाग तयार करणे, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने कमला नेहरू हॉस्पिटल येथे सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय करणे, अर्बन ९५ प्रकल्पाअंतर्गत लहान मुलांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे तसेच NABH नॉर्म्सप्रमाणे विकलांग किंवा दिव्यांगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे इ. स्थापत्य विषयक कामे करण्याचे खात्याचे नियोजन आहे.
संपूर्ण प्रकल्पाचे काम पुर्ण होण्यासाठी अंदाजे १२ महिने कालावधी लागणार आहे. काम हे १४,६९,२३,०५२ रक्कमेचे प्रकल्पीय काम असल्याने काम पूर्ण होणेसाठी यापुढील आर्थिक वर्षातील सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये उर्वरित कामासाठी १४,४७,२३,०५२ इतक्या तरतूदीची आवश्यकता लागणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७२ ब अन्वये यापुढील आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकामध्ये उर्वरित कामासाठी तरतूद उपलब्ध केली जाणार आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

COMMENTS