Kamla Nehru Hospital Dialysis Center | मध्यवर्ती  भागातील डायलिसिस ची गरज असणाऱ्या रूग्णांना दिलासा | कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 15 बेडचे डायलिसिस युनिट लवकरच सुरु होणार!

HomeBreaking Newsपुणे

Kamla Nehru Hospital Dialysis Center | मध्यवर्ती  भागातील डायलिसिस ची गरज असणाऱ्या रूग्णांना दिलासा | कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 15 बेडचे डायलिसिस युनिट लवकरच सुरु होणार!

गणेश मुळे Feb 21, 2024 12:25 PM

More than 71 thousand people have benefited from the low rate dialysis service started by Pune Municipal Corporation!
What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals? | पुणे महापालिकेने सुरु केलेल्या अल्प दरातील डायलिसिस सेवेचा आतापर्यंत 71 हजार हून अधिक लोकांनी घेतला लाभ! 
15 bed dialysis unit to start soon in PMC Kamala Nehru Hospital 

Kamla Nehru Hospital Dialysis Center | मध्यवर्ती  भागातील डायलिसिस ची गरज असणाऱ्या रूग्णांना दिलासा | कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 15 बेडचे डायलिसिस युनिट लवकरच सुरु होणार!

Kamla Nehru Hospital Dialysis Center | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) कमला नेहरू रुग्णालयात सुरुवातीला डायलिसिस सेंटर (Kamala Nehru Hospital Dialysis Center) सुरु करण्यात आले होते. हे सेंटर लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला चालवण्यास देण्यात आले आहे. मात्र या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या या डायलेसिस सेंटरमध्ये दैनंदिन कामकाजात अनियमितता आढळून आलेल्या होत्या. त्यामुळे संस्थेकडून काम काढून घेण्यात आले होते. परिणामी दवाखान्यातील डायलिसिस सेवा बंद होती. आता नव्याने 15 बेड्चे युनिट लवकरच सुरु केले जाणार आहे. हे काम टीएचएस वेलनेस प्रा लि (THS Wellness private Limited) कंपनीला दिले जाणार आहे. प्रशासनाने याबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे.
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) कमला नेहरू रुग्णालयात सुरुवातीला डायलिसिस सेंटर (Kamala Nehru Hospital Dialysis Center ) सुरु करण्यात आले होते. हे सेंटर लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला चालवण्यास देण्यात आले आहे. मात्र या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या या डायलेसिस सेंटरमध्ये दैनंदिन कामकाजात अनियमितता आढळून आलेल्या होत्या. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण होत होती, त्यामुळे महापालिका प्रशासनाने लायन्स क्लब वर सेंटर चालवण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच संस्थेकडून खुलासा देखील मागवला होता. मात्र संस्थेने महापालिकेवरच आरोप केले होते. त्यामुळे महापालिकेने संस्थेकडून काम काढून घेतले आहे. त्यामुळे महिन्याभरा पासून हे केंद्र बंद आहे. महापालिकेने आता नवीन टेंडर प्रक्रिया सुरु केली होती.
महापालिकेने टेंडर प्रक्रिया लागू केल्यांनतर 7 कंपन्या पुढे आल्या होत्या. त्यात टीएचएस चा दर सर्वात कमी होता. त्यामुळे कंपनी सोबत महापालिका हा प्रकल्प संयुक्त विद्यमाने चालवत आहे. कमला नेहरू हॉस्पिटल मधील 2000 चौ फूट जागा डायलिसिस युनिट आणि डायलिसिस संलग्न अतिदक्षता विभाग करण्यासाठी दिली जाणार आहे. संस्थेला ही जागा पाहिल्यान्दा 10 वर्ष आणि नंतर दोन वेळा मुदत 10 वर्ष वाढवून दिली जाणार आहे. जागेचे भाडे महापालिका संस्थेकडून घेणार नाही. मात्र स्टाफ पासून ते मशिनरी पर्यंतची सगळी यंत्रणा ही संस्थेला उभी करावी लागणार आहे.
खाजगी हॉस्पिटलचा भार सहन न करणाऱ्या गोरगरिबांना परवडणारी सुविधा देण्याचा भाग म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department Pune Municipal Corporation) आपल्या 8 दवाखान्यात पीपीपी तत्वावर अल्प दरात डायलिसिस ची सुविधा सुरु केली आहे. अवघ्या 400 रुपयांत ही सुविधा दिली जाते. गेली 7 वर्ष झाले, महापालिका ही सुविधा देत आहे. या सेवेचा आतापर्यंत 71 हजार हून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.  (What is the cost of one session of dialysis In PMC Pune Hospitals?)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) वतीने 2017 साली पहिल्यांदा कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये (Kamla Nehru Hospital PMC) डायलिसिस सेंटर सुरु केले.   पीपीपी तत्वावर केलेल्या सेंटर मध्ये फक्त 400 रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली. याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मग महापालिकेने अजून 7 हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरु केली. मात्र याची गरज अजून वाढतच आहे. कारण रुग्णाची संख्या देखील वाढत आहे.