Junior Pune Shree | पुणे जिल्हास्तरीय ज्युनिअर पुणे श्री स्पर्धेचे निकाल जाहीर!

HomeBreaking News

Junior Pune Shree | पुणे जिल्हास्तरीय ज्युनिअर पुणे श्री स्पर्धेचे निकाल जाहीर!

Ganesh Kumar Mule Jan 19, 2026 6:51 PM

Medical Management and IT Systems | एका क्लिकवर रुग्णाच्या पूर्वीच्या आजाराच्या उपचाराची माहिती मिळणार 
Pune News | अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे — राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Mohan Joshi | भारतीय टेनिकाईट महासंघ | माजी आमदार मोहन जोशी यांची ‘चीफ पेट्रॉन’पदी निवड

Junior Pune Shree | पुणे जिल्हास्तरीय ज्युनिअर पुणे श्री स्पर्धेचे निकाल जाहीर!

 

Body building Competetion – (The Karbhari News Service) – ज्यूनिअर पुणे श्री चा मानकरी शुभम मिसाळ, ज्यूनिअर मेन्स फिजिक्स श्रीचा मानकरी ओम शिंदे, मास्टर श्रीचा मानकरी मिलिंद खर्चे व दिव्यांग श्रीचा मानकरी युवराज राठोड ठरला.  अशी माहिती अजय लक्ष्मण गोळे, जनरल सेक्रेटरी, बॉडी बिल्डींग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांनी दिली. (Pune News)

पुणे जिल्हास्तरीय ज्युनिअर पुणे श्री 2026 ही स्पर्धा टेंभेकर लॉन्स पुणे सातारा रोड, बिबेवाडी, पुणे या ठिकाणी  19 जानेवारी  रोजी पार पडली. या स्पर्धेचे आयोजन  युनुस काझी व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या संलग्नतेने करण्यात आले होते. या स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सहभागी प्रत्येक स्पर्धकाला PROTEITION कडून सप्लीमेंट किट देण्यात आले.

बॉडी बिल्डर समीर साठे व शुभम मिसाळ यांच्या अतिशय अतितटीच्या झालेल्या सामन्यात ज्युनिअर पुणे श्री 2026 चा मानकरी क्राफ्ट फिटनेस जिमचा शुभम मिसाळ व उपविजेता समीर साठे ठरला.

मेन्स फिजिक्स ज्यूनिअर पुणे श्री मानकरी इलाईट फिटनेस जिमचा ओम शिंदे व उपविजेता हर्षद बामणे ठरला.
वय वर्ष 40 वरील मास्टर गटातून विजेता पार्थ जिमचा मिलिंद खर्चे व उपविजेता सोलारीस फिटनेसचा संजय आंबेडकर ठरला.
या गटातील प्रमुख आकर्षण दिव्यांग स्पर्धकांचा गटविचता युवराज राठोड ठरला

पुणे जिल्ह्यातील 150 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक  गौरव घुले, मानसीताई देशपांडे,  प्रीतम नागापुरे,  अभिजीत टेंभेकर, जनरल सेक्रेटरी  अजय गोळे,  राजेश वाईकर,  मंदार चवरकर,  मीनाक्षी ठाकूर, डॉ सचिन वानखेडे, मनीष पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पंच म्हणून अतुल राऊत, संग्राम पवार, विकास पाटील, कौस्तुभ शेडगे, ज्योती भादेकर, विशाल मोहिते, ओंकार शेवकर ,शरद तिवारी, उमेश मोहतकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

दिव्यांग श्री
पहिला क्रमांक युवराज राठोड, दुसरा क्रमांक महेश गायकवाड.

ज्यूनिअर मेन्स फिजिक्स पहिला गट
1 हर्षद बामणे, 2 फरदीन अत्तार, 3 प्रथमेश मोरे, 4 शंभुराजे लोंढे, 5 सुरज माने, 6 वेदांत हक्के

ज्यूनिअर मेन्स फिजिक्स दुसरा गट
1 ओम शिंदे, 2 मोनीश खान, 3 करण फुलसुंदर, 4 उत्कर्ष भगत, 5 ओमकार सुतार, 6 प्रणय मानकर

55 किलो गट
1 सार्थक बोरगे, 2 सुरज माने, 3 वैभव जामदार, 4 वैभव सोनवणे, 5 कृष्णा बंडलकर, 6 श्रेयश टिळेकर

60 किलो गट
1 करण फुलसुंदर, 2 ओंकार माने, 3 वेदांत हक्के, 4 आदित्य जगताप, 5 अरमान अन्सारी,

65 किलो वरील
1 शुभम मिसाळ, 2 आयुष साळुंखे, 3 आर्या शेलार, 4 अनवय खाडे, 5 अथर्व मंद्रे, 6 सिद्धांत कांबळे

खुला गट टॉप 6
1 विनायक कलरकंडी, 2 सैफ खान, 3 राहुल महादे, 4 ऋषिकेश बेळमकर, 5 गणेश बगाडे 6 सुरज सरोज.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण जाधव व विकास पाटील यांनी केले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: