लहान मुलांच्या लसीकरणासाठी किती काळ लागेल निश्चित नाही
:केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार
पुणे : कोरोनाल प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासाठी सुरक्षितेतच्या चाचण्या सध्या सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
: महापालिकेत कोरोना उपायांचा आढावा
पुणे महापालिकेने कोरोना आपत्तीच्या काळात केलल्या उपाययोजनांसह लसीकरण मोहिमेच्या कामाचा आढावा डॉ. पवार यांनी घेतला़, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते. पवार म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र देशात असले तरी महाराष्ट्र व केरळ राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आजही मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लादण्याबाबतचे आदेश त्या-त्या राज्यांना दिले आहेत. इतर देशांमध्ये कोरोना तिसरी-चौथी लाट आलेली आहे. अशा वेळी सर्वांना लसीचे दोन डोस पूर्ण करणे हे महत्वाचे काम आपण करत आहोत. देशातील अनेक राज्यांमध्ये काही ठिकाणी ९० टक्के तर काही राज्यांमध्ये ७० टक्क्यांच्या पुढे लसीकरण झाले आहे. संपूर्ण देशातील लसीकरण मोहिमेत लवकरच १०० कोटी जणांच्या लसीकरणाचा आकडा पार होर्ईल. मात्र ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना बुस्टर डोस देण्याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. शास्त्रीय अभ्यासावर बोलणे उचित ”राज्यात लसीचा एक डोस घेतलेल्यांना विविध ठिकाणच्या प्रवेशाबाबत मान्यता देण्यात येईल याबाबत नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.यावर बोलताना डॉ भारती यांनी, राजकीय भूमिकेपेक्षा एखादा निर्णय घेताना शास्त्रीय अभ्यास महत्वाचा असतो असे सांगितले. दरम्यान मंदिरे खुली करण्याबाबतची मागणी ही मंदिरांवर अवलंबून असलेल्या अनेकांच्या रोजगारासाठी करण्यात आली होती असेही त्या म्हणाल्या.”
COMMENTS