Prashant Jagtap Vs Chandrakant Patil : चंद्रकांतदादांना पुण्यात येऊन फक्त २.५ वर्षे झाली; मग ५ वर्षांचा हिशोब कुठून देणार ??

HomeपुणेBreaking News

Prashant Jagtap Vs Chandrakant Patil : चंद्रकांतदादांना पुण्यात येऊन फक्त २.५ वर्षे झाली; मग ५ वर्षांचा हिशोब कुठून देणार ??

Ganesh Kumar Mule Feb 21, 2022 4:42 AM

Rahul Gandhi on Reservation | आरक्षण रद्द करण्याच्या वादग्रस्त विधानावर राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा भाजप स्वस्थ बसणार नाही | उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
SIC Law | RSM | PMC employee | मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत
Pune BJP : पुणे शहर भाजपच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या उद्घाटन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती

चंद्रकांतदादांना पुण्यात येऊन फक्त २.५ वर्षे झाली; मग ५ वर्षांचा हिशोब कुठून देणार ??

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सवाल

पुणे : महापालिका निवडणूक (PMC Election) जवळ आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष (Pollitical Parties) आता जोरदार तयारी करत आहेत. शिवाय एकमेकांना खुली आव्हाने (Open Challenges) देत आहेत. नुकतेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसला (Pune NCP)  खुले आव्हान दिले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी देखील उत्तर दिले आहे. शिवाय काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले होते कि, “महापालिकेत भाजपाची सत्तेमुळेच ११ हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहाणी दौरे आणि उद्घाटने करत आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान आहे की, त्यांनी आणि आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन त्यांनी आपली सत्ता असताना ५० वर्षांच्या काळात काय काय केलं हे जनतेसमोर मांडावं. आम्ही पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडू.”

त्यावर प्रशांत जगताप म्हणाले, “कोणीतरी चंद्रकांत पाटलांना आठवण करून दिली पाहिजे की त्यांना पुण्यात येऊन फक्त २.५ वर्षे झाली आहेत. ५ वर्षांचा हिशोब कुठून देणार ??”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1