Integrated Tribal Development Project Kalvan | कळवण प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे कविता राऊत यांच्या उपस्थितीत उद्घाटन

HomeBreaking Newssocial

Integrated Tribal Development Project Kalvan | कळवण प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे कविता राऊत यांच्या उपस्थितीत उद्घाटन

कारभारी वृत्तसेवा Dec 09, 2023 7:29 AM

Drone | PMRDA चे ड्रोन तंत्रज्ञान झाले अधिक अत्याधुनिक
Mahaarogya camp | पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Integrated Tribal Development Project Kalvan | कळवण प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे कविता राऊत यांच्या उपस्थितीत उद्घाटन

Integrated Tribal Development Project Kalvan | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा (Integrated Tribal Development Project Kalvan) वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत प्रकल्प स्तरीय आश्रमीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा हरणबारी ता. बागलाण येथे करण्यात आले आहे. या तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आज हरणबारी येथे पार पडला. उद्घाटन समारंभात अर्जुन पुरस्कार प्राप्तऑलिंपियन धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. विशाल नरवाडे (भा.प्र.से) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण हे होते. (Integrated Tribal Development Project Kalvan)

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांची बैलगाडीतून मिरवणूकही काढण्यात त्यांच्या शुभ हस्ते भगवानवीर बिरसा मुंडा क्रीडा नगरी नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात समाविष्ट संघ आणि तालुका निहाय ध्वजासह संचलन केले यानंतर क्रीडा स्पर्धांची मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ती स्थापित करण्यात आली. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. बन्सीलाल पाटील कळवण यांनी केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी मच्छिंद्र जाधव यांनी प्रमुख अतिथी कविता राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची माहिती दिली.

या स्पर्धेमध्ये चार तालुक्यांचा समावेश केलेला असून यात कळवण सुरगाणा सटाणा देवळा अशा एकूण 79 शाळांचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत या स्पर्धेमध्ये 1286 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, हँडबॉल, 4 x 100, 4 x 400  या संगीत खेळाचा तर शंभर मीटर, दोनशे मीटर, चारशे मीटर, सहाशे मीटर, आठशे मीटर, पंधराशे मीटर,  तीन हजार मीटर, पाच हजार मीटर धावणे तसेच उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक या खेळाचा सहभाग यात घेतला आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना खेळाचे संपूर्ण किट वाटप करण्यात आले. प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. डॉ.भारती प्रविण पवार, कळवण सुरगाणा विधानसभा सदस्य मा. नितीन अर्जुन (ए.टी)पवार व बागलाण विधानसभा सदस्य मा..दिलीप मंगळू बोरसे यांचा शुभेच्छा संदेश देण्यात आला.

यावेळी प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे मुख्य आकर्षण केंद्रबिंदू असलेल्या अर्जुन पुरस्कार प्राप्त ओलंपियान धावपटू सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांना खेळामध्ये खूप संधी उपलब्ध असून या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात विशाल नरवाडे भा.प्र.से  यांनी प्रकल्पातील खेळाडूंसाठी 400 मीटर ट्रॅक,कबड्डी व खोखो खेळांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर तसेच प्रशासकीय दृष्ट्या गती देऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, क्रीडाक्षेत्रात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी उपलब्ध असेल असे आश्वासन दिले.

उदघाटन समारंभासाठी कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी  डॉ.बी. एम. पाटील,नवनाथ जानकर, लेखा अधिकारी एस बी चौधरी ,भगवान निकम,मच्छिंद्र जाधव सहाय्यक लेखा अधिकारी ए एम भडांगे तसेच शिक्षण विस्ताराधिकारी आर.आर. तोरणे,एस.सी. पवार, आर.एस.साबळे, एस व्ही पाटील, एस एस चौधरी तसेच प्रकल्प क्रीडा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देवरे, उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, मुख्याध्यापिका वैशाली चव्हाण, विषय मित्र विजय नेटके व रामसिंग राजपूत,इतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोकरे व  प्रीती पगार यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक  विकास देवरे यांनी केले..

—-

खेळ आणि आदिवासीं विद्यार्थ्यांचे अतूट नाते आहे. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील कविता, दिलीप गावित ,दिलीप खांडवी, हेमलता गायकवाड,चंदू चावरे यासारखे खेळाडूंची नावे चमकत आहेत. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कळवण प्रकल्पातखो खो खेळासाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा प्रस्ताव तसेच धावण्याच्या सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक निर्माण करणार आहे.

विशाल नरवाडे भा.प्र.से., सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण

———