काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहोत | अरविंद शिंदे
या देशामध्ये काँग्रेसच स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होती त्यामुळे काँग्रेस अभिमानाने नेत्यांचे फोटो लावू शकतात परंतु सत्तेत बसलेल्यांकडे एकही स्वातंत्र्य सैनिक नाही ज्याचा फोटो ते लावू शकतील. आज देशात जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच लोकशाही व संविधान पायदळी तुडविणारे बसलेले असून स्वातंत्र्याचा दुसरा लढा लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. असे शहर कॉंग्रेस चे प्रभारी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने या देशामध्ये लोकशाही टिकवलीच नाही तर देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामनात रुजविली परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर त्यावेळेस तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली त्या शामाप्रसाद मुर्खीजींना आपला प्रमुख मानून आज देशामध्ये बसलेले हे सरकार तिरंग्याचे महत्व सांगत आहेत. काँग्रेस ती आहे ज्यांनी या तिरंगी झेंड्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. छातीवर गोळ्या झेलल्या, आपल्या संसाराची राखरांगोळी केली. काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहे. आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देशामध्ये चाललेल्या जाती धर्माच्या राजकारणाच्या विरोधात व खोटी देशभक्ती दाखविणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून काँग्रेसने या देशासाठी केलेले बलिदान सांगण्याची गरज आहे. या देशामध्ये काँग्रेसच स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होती त्यामुळे काँग्रेस अभिमानाने नेत्यांचे फोटो लावू शकतात परंतु सत्तेत बसलेल्यांकडे एकही स्वातंत्र्य सैनिक नाही ज्याचा फोटो ते लावू शकतील. आज देशात जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच लोकशाही व संविधान पायदळी तुडविणारे बसलेले असून स्वातंत्र्याचा दुसरा लढा लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.’’
यानंतर स्वातंत्र्य सैनिक श्रीमती. अन्नपूर्णा गुलाब माथवड यांचा सन्मान व लोकायतचे श्री. निरज जैन यांचा सन्मान ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड, दिप्ती चवधरी, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, अनिल सोंडकर, नितीन परतानी, दिलीप ढमढेरे, भीमराव पाटोळे, नीता रजपूत, रमेश अय्यर, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे, शिवाजी बांगर, द. स. पोळेकर, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, ॲड. अनिल कांकरिया, शानी नौशाद, सुंदरा ओव्हाळ, दिपक ओव्हाळ, प्रकाश पवार, विठ्ठल गायकवाड, भुषण रानभरे, रॉर्बट डेविड, सुमित डांगी, किशोर मारणे, रवि ननावरे, दिपक ओव्हाळ, अशोक लांडगे, राजेंद्र पडवळ, सुनिल दैठणकर, राजू अरोरा, रजिया बल्लारी, मनोहर गाडेकर, ॲड. शाबिर खान, आयुब पठाण, प्रकाश आरणे, चैतन्य पुरंदरे, गौरव बोराडे, राजू शेख, स्वाती शिंदे, पपिता सोनावणे, वैशाली रेड्डी, बाळासाहेब प्रताप, प्रा. वाल्मिक जगताप, शिवानंद हुल्याळकर, शोभना पण्णीकर, भारती कोंढे, शमशाद बेलिम, आबा जगताप, सिमा महाडिक, प्रल्हाद खेसे, अंजली सोलापूरे, जयश्री पारेख, आशा बुजवे, आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.