India Aghadi | विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय | काँग्रेस भवनात जल्लोष
Congress Bhavan Pune – (The Karbhari News Service) – सात राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीत (Vidhansabha By Election) इंडिया आघाडीने (India Aghadi) १० जागा जिंकल्याबद्दल काँग्रेस भवनात (Congress Bhavan Pune) कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) जल्लोष केला.
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ इंडिया आघाडीची घोडदौड चालू राहिल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पेढे वाटले, फटाक्यांची आतषबाजी केली.
पवित्र तीर्थक्षेत्र बद्रीनाथ येथील जागा, हिमाचल प्रदेशातील दोन जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. या पवित्र तीर्थक्षेत्रांवर इंडिया आघाडीला मिळालेला विजय अर्थपूर्ण आहे, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.
या विजयी आनंदोत्सवात पीएमटी चे माजी चेअरमन चंद्रशेखर कपोते, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वय किशोरी मीना, युवक काँग्रेस पुणे चे अध्यक्ष सौरभ अमराळे, पीएमटी चे माजी सदस्य ॲड.शाबीर खान, माजी नगरसेवक आयुब पठाण, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सरचिटणीस सुरेश कांबळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल, इंद्रजीत ताकवले, ॲड.निलेश बोराटे, चंदाबाई कांबळे, धनंजय देशमुख, विजय वारभुवन, गोरख पळसकर, उमेश कंधारे, चंदन पाचंगे, योगेश चव्हाण ,साहिल राऊत, फैयाज शेख, आनंद खन्ना, मंगेश थोरवे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.