समाविष्ट 23 गावातील 408 कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समावेशन
| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आदेश
पुणे | पुणे महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या ग्रामपंचायतीचा कारभार क्षेत्रीय कार्यालयाने ताब्यात घेतला होता. या गावात सुमारे 408 कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांचे 30 जून 2021 पासून महापालिकेत समावेशन करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार महाळुंगे, सूस, बावधन-बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी- बुद्रुक, नहे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली अशा तेवीस तत्कालीन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे. सदर तत्कालीन समाविष्ट तेवीस ग्रामपंचायतीचे सर्व कार्यालयीन कामकाजाशी निगडीत कागदपत्रे विविध क्षेत्रिय कार्यालय यांनी ताब्यात घेतलेली आहेत.
हडपसर-मुढंवा क्षेत्रिय कार्यालय कडे औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक ही गावे, वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय कडे कोंढवे-धावडे, कोपरे, कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय कडे गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी वाघोली, नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय कडे वाघोली, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय कडे
जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय कडे नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, नऱ्हे, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय कडे म्हाळुंगे, सुस तर बावधन बुद्रुक या गावांचा कारभार कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयकडे देण्यात आला आहे.
जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय कडे नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, नऱ्हे, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय कडे म्हाळुंगे, सुस तर बावधन बुद्रुक या गावांचा कारभार कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयकडे देण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उपरोक्त क्षेत्रिय कार्यालयासमोर दर्शविलेल्या समाविष्ट तत्कालीन तेविस ग्रामपंचायतीकडील ग्रामपंचायत आस्थापनेवरील सेवक वर्ग महापालिका आस्थापनेवर सामावून घेणेबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ४९३ परिशिष्ट ४ मधील कलम ५ (क) मध्ये असलेली तरतुद व शासन निर्णय वरील समाविष्ट तत्कालीन तेवीस ग्रामपंचायतीचे आस्थापनेवरील 408 सेवकांच्या सेवा खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून महापालिका आस्थापनेवर दि. ३०/०६/२०२१ पासून समावेश करण्यात येत आहेत. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
——
समाविष्ट गावातील कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समावेशन करण्यासाठी मी आणि शिवसेना प्रवक्ता व प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत महापालिकेला आदेश केल्यानंतर आम्ही महापालिका प्रशासनाकडे देखील याचा पाठपुरावा केला. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे समावेशन झाले आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद देतो.