पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न
८ कोटी २७ लाख
| गणेशोत्सव काळातील उत्पन्न
| तर विनातिकीट प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार दंडवसूल
श्री गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही‘पीएमपीएमएल’ कडून गणेशोत्सवाकरीता नियमितच्या बसेस व्यतिरिक्त जादा६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. ‘पीएमपीएमएल’ने दि. ३ सप्टेंबर २०२२ ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ८ कोटी २७ लाख ४५ हजार ७३२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. या कालावधीत एकूण ८१४३ बसेसद्वारे ५७ लाख ४३ हजार २४८प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ घेतला. तसेच बसेस तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवाश्यांकडून २ लाख ९१ हजार ६०० रूपये दंडवसूल करण्यात आला.
अ.क्र |
दिनांक |
एकूण मार्गावरील बसेस |
एकूण उत्पन्न रूपये |
एकूण प्रवासी |
एकूण दंडवसुली रूपये |
१. |
०३/०९/२०२२ |
१६३४ |
१,५५,६०,९३५/- |
१०,३५,५१४ |
२२,७००/- |
२. |
०४/०९/२०२२ |
१५५६ |
१,४४,८७,२५९/- |
९,५३,०६८ |
६०,३००/- |
३. |
०५/०९/२०२२ |
१६४७ |
१,७९,४०,७१४/- |
१२,९०,६०० |
७२,६००/- |
४. |
०६/०९/२०२२ |
१६४७ |
१,७५,६८,३५२/- |
१२,५२,७३९ |
७३,४००/- |
५. |
०७/०९/२०२२ |
१६५९ |
१,७१,८८,४७२/- |
१२,११,३२७ |
६२,६००/- |
एकूण |
८१४३ |
८,२७,४५,७३२/- |
५७,४३,२४८ |
२,९१,६००/- |
सध्या पीएमपीएमएलच्या श्री गणेशोत्सव कालावधीत जादा बसेस मार्गावर संचलनात आहेत. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.