अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचा महत्वाचा आदेश
पुणे : पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करणेबाबत विनंती अर्ज, शिफारशी प्राप्त होत आहेत. मात्र सद्यस्थितीत कोव्हिड-१९ व पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने पुणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करणेबाबत नियमीत बदली प्रक्रियेवेळी विचार करता येईल. त्यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा खात्याने बदलीबाबत विनंती अर्ज किंवा प्रस्ताव सादर करु नयेत. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.
: असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे धोरण मा. महापालिका सभेने ठरावान्वये मंजूर केलेले आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी – ब ते श्रेणी – ड मधील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी व प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना सुपूर्त केलेले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ व पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने पुणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करणेबाबत नियमीत बदली प्रक्रियेवेळी विचार करता येईल. त्यामुळे कोणत्याही अधिकारी / कर्मचाऱ्याने / खात्याने बदलीबाबत विनंती अर्ज, प्रस्ताव सादर करु नयेत. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS