रिक्त पदे भरल्यानांतर अतिरिक्त पदभार दिलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा
: सामान्य प्रशासन विभागाचे खाते प्रमुखांना आदेश
: असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील विविध पदांवर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी विविध खात्यांमधील रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार सोपविला जातो किंवा त्यांना प्रत्यक्ष कामकाजासाठी विविध खात्यांकडे उपलब्ध करून दिले जाते. अशाप्रकारे अधिकारी/कर्मचारी यांना ज्या खात्यांमधील रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला जातो किंवा ज्या खात्यांमध्ये प्रत्यक्ष कामकाजासाठी उपलब्ध करून दिले जाते. तेथील रिक्त पदे भरल्यानंतर सदर खात्यांच्या खातेप्रमुख यांनी सदर अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या मूळ खात्याकडे कामकाजासाठी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. त्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यता नाही. परंतु, अशा अधिकारी/कर्मचारी यांना सदर खात्यांच्या खातेप्रमुख यांनी मूळ खात्याकडे कामकाजासाठी कार्यमुक्त केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशाप्रकारे रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपविलेल्या किंवा प्रत्यक्ष कामकाजासाठी उपलब्ध करून दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना खात्याकडील रिक्त पदे भरल्यानंतर खातेप्रमुख यांनी त्वरित मूळ खात्याकडे कामकाजासाठी कार्यमुक्त करावे. तसेच, त्याबाबतचा अहवाल इकडील विभागास सादर करावा. अन्यथा, अशा अधिकारी/कर्मचारी यांना खात्याकडील रिक्त पदे भरल्याच्या दिनांकापासून मूळ खात्याकडे कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यात आल्याचे समजण्यात येईल.
COMMENTS