Rajesh Tope: Indorikar Maharaj : आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात; मी लस घेणार नाही असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांना नक्की भेटणार

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Rajesh Tope: Indorikar Maharaj : आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात; मी लस घेणार नाही असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांना नक्की भेटणार

Ganesh Kumar Mule Nov 04, 2021 3:36 PM

Booster Dose | Corona | उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस
Kamva Ani Shika Yojana | ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण
Skills Upgrading Policy | कालानुरुप बदलणाऱ्या तंत्रज्ञान, कौशल्यास अनुसरुन राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर

मी लस घेणार नाही असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांना नक्की भेटणार 

: आरोग्यमंत्री राजेश टोपे 

बारामती : किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी मी स्वत: लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. असे नाशिकमध्ये एका किर्तनात बोलताना वक्तव्य केले आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे हे इंदुरीकर यांना नक्कीच भेटणार असल्याचे सांगितले आहे. बारामतीत बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना शास्त्रीय दृष्टीकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे. मी स्वत: वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन. किर्तनकार देशमुख ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच भेटून बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

”गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे ते बाधित झाले नाहीत. महाराजांनी स्वत:ला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सींग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर कोविड लसीला महत्त्व आहे. लस ही कवचकुंडल आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होत नाही असे नाही, परंतु लस घेतल्यावर रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत नाही, त्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही, आयसीयूमध्ये दाखल करावे लागत नाही. लसीमुळे लसीमुळे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे लस घेणे गरजेचे आहे. काही समाजामध्ये लसीबाबत गैरसमज आहेत. त्यांच्या धर्मगुरुंशी आम्ही बोलून लसीची उपयुक्तता पटवून दिली आहे. इंदूरीकरांनाही मी लक्ष घालून यासंबंधी निश्चित सांगणार असल्याचे टोपे म्हणाले आहेत.”

आमचे आकडे नेहमीच बिनचूकच; दिशाभूल करण्याचा विषयच नाही 

”केंद्र व राज्याच्या आकडेवारीत जर काही फरक असल्यास जुळवणी करण्याचे काम केले जाईल. ‘को विन’ अ‍ॅपवर अत्यंत पारदर्शीपणे अपडेटेड डेटा असतो. त्या ‘डेटा’च्या अनुषंगानेच आकडेवारी तयार होते. कोविडच्या काळात आकड्यांबाबत कधीही चुकीची माहिती आम्ही दिलेली नाही. रुग्णांचे आकडे असोत कि मृत्यूचे असोत की आता लसीकरणाचे असो. आमचे आकडे नेहमीच बिनचूकच असतात. त्यामुळे दिशाभूल करण्याचा विषय राहतच नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकता हा आमचा मूल सिद्धांत राहिला असल्याचे टोपे यांनी सांगितले.”

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    केंद्र व राज्य सरकारने ज्या कोळी च्या संदर्भात दिलसे सांडलेले आहे किंवा आदर आणि काय असेल त्या त्यावर ती स्पष्टपणे लिहिलेला आहे की या लस घेण्याअगोदर तुम्ही तुमची खात्री करा कारण या लस घेतल्यानंतर तुम्ही होऊन पासून बरे व्हाल असे सांगता येत नाही किंवा त्याची गॅरंटी देतो मग ती लस का घ्यावी कुणी सरकार जोर जबरदस्ती का करत आहे आणि राजेश टोपे राजेश टोपे यांनी घेतली आहे का जर घेतले असेल तर ती कोणाच्या समोर घेतली आहे त्याच्या वरती भरोसा नाही राज्यातल्या मंत्रिमंडळाने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी कोणती लस घेतली नाही एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या मंत्री मंडळातील पदाधिकारी निमंत्रित यांच्या कुटुंबीयांनी देखील घेतली नाही तुम्ही सामान्य जनतेवर ती का जबरदस्ती करता भारतीय घटनेने अधिकार दिलेला आहे का प्रत्येक वेळी शेतकरी संघटनेने कोर्टात जाऊन दाद मागायची का आणि तसं असेल तर तुम्ही त्या इंजेक्शनच्या बॉटल वर लिहिलेला आहे की हे इंजेक्शन तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारी होती घ्यावे व त्याला अर्थ आहे का तुम्ही जबरदस्ती का करता याची तुम्हाला स्वतःला गॅरंटी नाही ज्या कंपन्यांनी निर्माण केली त्यांच्या आरडी ला सुद्धा प्रश्न पडलेला आहे तुम्ही लोकांना असता आणि तुम्हाला सुचायचंच आहे मी पैसाच खायचा आहे तो पैसा ही खाण्याची वस्तू नये खाण्यासाठी अन्न लागते आणि ते फक्त शेतकरी पिकवतो तुम्हाला जर जास्त मस्ती आली असेल तर तुम्ही खाऊ नका तुम्ही पैसे देऊ नका जे काय असेल ते का कमवा पण तुम्ही सर्वसामान्य नागरिकांवर जोर जबरदस्ती करून देखील नाही एखादा खोट जर या संविधानाच्या विरोधात जात असतील की एखाद्याला घटनेविरोधात तुम्ही तुम्हाला देणार असाल तिथे सुद्धा पुढे जाऊन द्यावा लागेल सोपं नाहीये राजेश टोपे राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तलाठी आहे

DISQUS: 0