किरीट सोमय्यांचा महापालिकेत कसा झाला प्रवास; काय म्हणाले सोमय्या ?
पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या पुणे मनपात येणार म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानुसार मग 4:30 च्या दरम्यान सोमय्या जुन्या इमारतीच्या आउट गेटने पालिकेत आले. मनपा भवन च्या इमारतीजवळ आल्यावर ते तडक शेजारील भाजप कार्यालयात गेले. तेथून युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्यांना घेऊन आणि आरडाओरडा करत महापालिकेत आले. मग त्याच पायऱ्यांजवळ धक्काबुकी करत सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. मग तेथून सोमय्या महापालिका आयुक्तांना भेटले. पुन्हा खाली आल्यानंतर त्यांनी धक्काबुक्की सहन करत पत्रकारांशी संवाद साधला.
सोमय्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आर्थर रोड मधील अनिल देशमुख ज्या कोठडीत आहेत त्याच्या बाजूची कोठडी सॅनिटाइज आणि स्वच्छ करायला सांगा तेथे अनिल परब (Anil Parab) आणि संजय राऊत (Sanjay Raut)यांना पाठवायचं आहे असा टोला पत्रकार परिषदेत सोमयांनी( Kirit Somaiya)मारला.ते म्हणाले, राऊत यांचा एक पार्टनर प्रवीण राऊत जेलमध्ये आहेत. जर सुजित पाटकर जेलमध्ये गेले तर राऊत यांचं काय होणार? असा सवालही सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांना प्रवीण राऊत ईडीला माहिती देतील याची भीती वाटत आहे असेही सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी याच पायऱ्यांवर माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीनं ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिले होते असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरें यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांचे नाव सांगावे. त्यांचा मालक केएम हॉस्पिटलचा मालक आहे. उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्याच लोकांच्या जीवाशी खेळले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची बेनामी संपत्तीवर कारवाई केल्याशिवाय हा सोमय्या गप्प बसणार नाही.
पुण्यात जंम्बो रूग्णालयासाठी कंत्राट देण्यात आलेली कंपनी बोगस असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. आयुक्तांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील दावा केला आहे. (Kirit Somaiya News)गेल्या शनिवारी सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज सोमय्या पुन्हा आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी ज्या पायरीवर हल्ला करण्यात आला होता, त्याच पायरीवर किरीट सोमय्यांचा शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारे सत्कार करण्यास पोलिसांकडून परवानगी नव्हती, मात्र तरीही हा सत्कार करण्यात आला आहे.तत्पूर्वी बोलताना सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी याच पायऱ्यांवर माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. महाविकास आघाडीनं ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिल्याचे आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्याच लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची बेनामी संपत्तीवर कारवाई केल्याशिवाय हा सोमय्या गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
COMMENTS