Hotel Vaishali Pune |PMC Encroachment Action |  एफसी रोड वरील वैशाली हॉटेल वर महापालिकेकडून कारवाई 

HomeपुणेBreaking News

Hotel Vaishali Pune |PMC Encroachment Action |  एफसी रोड वरील वैशाली हॉटेल वर महापालिकेकडून कारवाई 

Ganesh Kumar Mule Sep 20, 2023 1:37 PM

PMC Illegal Construction Action | कर्वे नगर परिसरातील रेणुका रेसिडेन्सीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई 
Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले
PMC Action against Pub and Bar | पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील 40 हॉटेल, रेस्टॉरंट वर कारवाई! 

Hotel Vaishali Pune |PMC Encroachment Action |  एफसी रोड वरील वैशाली हॉटेल वर महापालिकेकडून कारवाई

 

Hotel Vaishali Pune |PMC Encroachment Action | पुणे पेठ शिवाजीनगर भागातील F C रोड वरील हॉटेल वैशाली (Hotel Vaishali on FC Road) तसेच क्वीन्स शॉप स्टोरी याठिकाणी बांधकाम विकास विभाग झोन ६ (PMC Building Devlopment Department Zone 6) या विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 3500 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती उप अभियंता सुनिल कदम  (Deputy Engineer Sunil Kadam) यांनी दिली.

या मध्ये बांबू, पत्रा , लोखंडी अँगल , ओनिग ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड, ई. चा समावेश आहे. वैशाली हॉटेल मधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड काढण्यात आल्या. यावेळी हलवता येणारे ओनिग शेडही गॅस कटर ने कापुन काढण्यात आले. कार्यकारी अभियंता  बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उप अभियंता  सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण केली. यापुढेही कारवाई चालू राहणार आहे तसेच जर पुन्हा शेड उभारली तर गुन्हा दाखल करण्यात येईल उप अभियंता सुनिल कदम  यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation)


News Title | Hotel Vaishali Pune |PMC Encroachment Action | Action by Municipal Corporation on Vaishali Hotel on FC Road