हेमंत रासने यांनी पक्ष आणि पक्षातील महत्वाच्या नेत्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
: हेमंत रासने रचणार इतिहास
पुणे : महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी (PMC Standing Committee Chairman) भाजपने (BJP) विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनाच पुन्हा संधी दिली असून महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस चे नगरसेवक प्रदीप गायकवाड (Corporator Pradip Gaikwad) यांना उमेदवारी (Candidacy) देण्यात आली आहे. येत्या 14 मार्चला महापालिकेची (Pune Municipal Corporation) मुदत संपुष्टात येत असून नवीन समितीला जेमतेम 14 दिवसच कामकाजाची संधी मिळणार आहे. दरम्यान रासने यांनी पक्ष आणि पक्षातील महत्वाच्या नेत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
: 4 तारखेला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक
येत्या 4 तारखेला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने हेमंत रासने यांची निवड निश्चित मानली जात आहे. हेमंत रासने हे सलग तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले असून पक्षाने चवथ्यावेळी संधी दिली आहे. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक (Corporator) ठरणार आहेत.
पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा मला काम करण्याची संधी देऊन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे व माझे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, खासदार गिरीशजी बापट, संजयजी काकडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहरातील भाजपाचे सर्व आमदार, मा. महापौर, सभागृह नेते, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या सोबत कायम असणारे माझे सहकारी, हितचिंतक आपणा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
COMMENTS