Hanuman Jayanti | गुलशाची तालीम येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी!
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील 1874 सालापासून ऐतिहासिक असलेल्या गुलशाची तालीम येथे श्री हनुमान जयंती दरवर्षीप्रमाणे उत्साहाने साजरी करण्यात आली. बाजीराव पेशवे दुसरे यांनी या तालमीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. (Lord Hanuman Jayanti)
गुलशे तालमीने अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पहिलवानांची कारकीर्द घडवली आहे . सद्यस्थितीत सुमारे शंभर ते दीडशे युवा तरुण तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. पुण्यातील जाधव कुटुंबीयांची चौथी पिढी गुलशे तालमीचे सर्व कामकाज पाहत आहे. गुलशे तालमीचे वस्ताद पैलवान भूषण दादा विजयराव जाधव यांनी याप्रसंगी श्री हनुमान जयंती निमित्त सदर भागातील युवकांसोबत हनुमानाचे पूजा करून नागरिकांना प्रसादाचे वाटप केले.
COMMENTS