Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

HomeपुणेBreaking News

Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

Ganesh Kumar Mule Oct 18, 2022 3:16 AM

Two Municipal Corporation in Pune | पुणे शहरात दोन महापालिकांच्या प्रस्तावाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय संकेत दिले! 
Chandrakant Patil | पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू -चंद्रकांतदादा पाटील | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी
Polytechnic Admissions 2025 | पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजातील गरजू व्यक्तींना मदत करावी आणि सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सूचवाव्यात असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे घाडगे आदी उपस्थित होते

पुरस्कारप्राप्त गणेश मंडळाचे अभिनंदन करुन  पाटील म्हणाले, कोरोना संकटानंतर सार्वजनिक उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. गणेशोत्सव उत्साहाने आणि शांततेत साजरा करण्यात पोलीसांसोबत मंडळांची भूमिका महत्वाची आहे. गणेशोत्सवाप्रमाणे दिपावलीच्या काळात सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण असल्यामुळे नागरिकांना निर्भयपणे संचार करता येतो, बेरोजगारांना रोजगार मिळतो. त्यामुळेच हे शहर कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठीचे उत्तम शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पोलिस आस्थापना पायाभूत सुविधा योजनेतून पोलीसांसाठी वाहने खरेदीसाठी २ कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सण-उत्सव साजरे करताना नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्बंध होते. यावर्षीचा गणेशोत्सव गणेश मंडळांच्या सहकार्यामुळे उत्साहात साजरा केला. पुण्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आदर्श गणेशोत्सव स्पर्धा-२०२२ अंतर्गत पाच पोलीस परिमंडळातील विविध गणेशमंडळांना सजावट व मिरवणूकीचे मार्ग या गटात बक्षीस वितरित करण्यात आले.

पुणे पोलिसाचा कामगिरीवर आधारित मांडणारा ‘@ पुणे’ या कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.