GBS Outbreak | GBS चा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात पाईपलाईन च्या माध्यमातून पाणी देण्याची मागणी   | माजी नगरसेवकांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी 

Homeadministrative

GBS Outbreak | GBS चा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात पाईपलाईन च्या माध्यमातून पाणी देण्याची मागणी  | माजी नगरसेवकांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी 

Ganesh Kumar Mule Jan 30, 2025 8:39 PM

Ajit Pawar | प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा | अजित पवार
Chandrakant patil : मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील 
Sinhgad Road Flyover | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

GBS Outbreak | GBS चा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात पाईपलाईन च्या माध्यमातून पाणी देण्याची मागणी

| माजी नगरसेवकांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी

 

GBS in Pune – (The Karbhari News Service) – गुलियेन बॅरी सिंड्रोम या रोगाचा प्रसार रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. GBS चा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात पाईपलाईन च्या माध्यमातून पाणी देण्याची मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. (PMC Water Supply Department)

माजी नगरसेवकांच्या निवेदनानुसार  पुणे शहरात आणि विशेष करून सिंहगड रोड मधील वरील नांदेड गाव परिसरात असलेल्या विहिरीतील दूषित पाण्यामुळे गुलियेन बॅरी सिंड्रोम (GBS) या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. पुणे महानगरपालिका यासंदर्भामध्ये युद्धपातळीवर काम करीत आहे. नांदेड सिटी या स्पेशल टाऊनशिपला राज्य सरकारने विशेष बाब म्हणून खडकवासला धरणातून पाईप लाईन ने पाणी उचलून दिलेले आहे. सध्या या परिसरात असणाऱ्या सांसर्गिक रोगाचा विचार करून नांदेड सिटी ला जे पाईपलाईनने धरणातून पाणी उचलून दिले आहे ते पाणी आजूबाजूच्या इतर गावकऱ्यांना विशेष बाब म्हणून (preventive to pandemic)
महापालिका आयुक्त यांच्या अधिकारात असलेल्या एमएमसी अॅक्ट कलम ६७ (३) C प्रमाणे तात्पुरती पाईपलाईन टाकून त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश द्यावेत त्यामुळे या संसर्गाला जागीच आळा बसेल.

अशाप्रकारे पाणीपुरवठा करता येईल असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागातील संसर्गिक रोगाच्या उपाययोजना करण्यासाठी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना द्यावेत. असे निवेदनात म्हटले आहे.