Garden in Narhe Ward 34 | नर्हे परिसरात 4 एकरात साकारणार उद्यान | उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन  | परांजपे अभिरुची परिसर ते स्वारगेट बसमार्गाचे देखील उद्घाटन

HomeBreaking News

Garden in Narhe Ward 34 | नर्हे परिसरात 4 एकरात साकारणार उद्यान | उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन | परांजपे अभिरुची परिसर ते स्वारगेट बसमार्गाचे देखील उद्घाटन

Ganesh Kumar Mule Mar 01, 2026 2:34 PM

BJP Delegation | पुणेकरांची मिळकत करातील ४०% सवलत कायम ठेवावी’ | भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
Sasoon Hospital Pune | ससून मधील कर्करोग रुग्णालयासाठी सुधारीत प्रस्ताव | वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
BJP MLA | PMC | लोकप्रतिनिधी म्हणून मला महापालिका कसलाही संपर्क करत नाही! | भाजपच्या आमदारांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली व्यथा 

Garden in Narhe Ward 34 | नर्हे परिसरात 4 एकरात साकारणार उद्यान | उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन

| परांजपे अभिरुची परिसर ते स्वारगेट बसमार्गाचे देखील उद्घाटन

 

Pune Narhe Area – (The Karbhari News Service) – नर्हे परिसरात नर्हे धायरी रस्त्यावर व्यंकटेश शर्विल सोसायटी शेजारील ४ एकर जागेत (सर्व नं २६) उद्यान साकारणार आहे. या उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार भीमराव तापकीर आणि भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परांजपे अभिरुची परिसर ते स्वारगेट बसमार्गाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रभागातील ४ ही नगरसेवक आणि आसपासच्या सोसायट्यांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (PMC Ward 34)

या गार्डनच्या निर्मितीमुळे नरे-धायरी, नरेगाव व वडगाव खुर्द परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार असून भविष्यात हे ठिकाण एक प्रमुख विरंगुळा केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे. गार्डनमध्ये चिल्ड्रन्स पार्क, ओपन जिम, चालण्यासाठी प्रशस्त ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, हिरवळ (लॉन), आकर्षक फाउंटन अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

प्रभाग ३४ चे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या पाठपुराव्यामुळे आणि नगरसेवक कोमल नवले, राजाभाऊ लायगुडे आणि जयश्री भूमकर यांच्या पाठींब्याने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या जागेवर डीपी मध्ये बगीचा चे आरक्षण दर्शवण्यात आले आहे. तसेच पूर्ण जागा ही महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रिया करून याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. असे नगरसेवक हरिदास चरवड यांनी सांगितले.

तसेच यावेळी चरवड यांनी सांगितले की, नर्हे परिसरात पाण्याची मुख्य समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढायला हवा आहे. कारण या परिसरातील पाण्याची समस्या नाही सोडवली तर लोक आम्हाला सोसायटीच्या आत येऊ देणार नाहीत. आमदार तापकीर आणि शहराध्यक्ष घाटे आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे चरवड यांनी मागणी केली कि, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी खडकवासला ते नर्हे परिसरात १८ इंची पाण्याची लाईन (Raw Water Pipe Line) टाकायला हवी आहे. त्यासाठी मी माझे प्रभागातील बजेट वापरतो. मात्र याला प्रशासनाचा पाठिंबा हवा आहे.

यावर आमदार भीमराव तापकीर यांनी आश्वासन दिले कि, प्रशासकीय स्तरावर आणि आमदार निधीतून देखील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रभागात नागरी सुविधा देण्यासाठी चार ही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आणि एकजूट होऊन काम करायला हवे आहे. तसेच तापकीर यांनी सांगितले कि, आमदाराला ५ वर्ष काम करण्यासाठी फक्त ५ कोटी निधी मिळतो. मात्र चारही नगरसेवकांना दरवर्षी २० कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे परिसराचा विकास करण्याचे काम नगरसेवक चांगल्या पद्धतीने करू शकतात.

भाजप शहर अध्यक्ष घाटे यांनी सांगितले कि, राज्य सरकार आणि महापालिका मध्ये भाजप ची सत्ता आहे. त्यामुळे आता विकासकामे करण्यास वाव आहे. आम्ही या भागाचा विकास करण्यास कटिबद्ध आहोत.

कार्यक्रमास सचिन बेलकर, सुनील वाल्हेकर, राजाभाऊ वाडेकर, सतीश कुटे, बाळासाहेब नवले, सारंग नवले, यशवंत लायगुडे, गंगाधर बडवळे, अनंता भडवळे यांच्यासह गणेश कुटे, यशवंत कांबळे, सुनील चरवळ, चंदन कड, कोमल कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

परिसरातील नागरिकांसाठी हे गार्डन एक नवीन ओळख निर्माण करणारे, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जीवनशैलीस चालना देणारे ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

दरम्यान यावेळी परांजपे अभिरुची परिसर ते स्वारगेट बसमार्गाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले. या परिसरात बस ची सुविधा नव्हती. पूर्वी होती पण ती बंद करण्यात आली होती. नागरिकांना बस साठी दूर जावे लागायचे. मात्र आता जवळच बस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: