Ganesh Visarjan 2025 | टिळक पुतळ्या जवळील महापालिकेच्या स्वागत कक्षावर पोलिसांचे अतिक्रमण : माजी महापौर संघटने कडून निषेध 

Homeadministrative

Ganesh Visarjan 2025 | टिळक पुतळ्या जवळील महापालिकेच्या स्वागत कक्षावर पोलिसांचे अतिक्रमण : माजी महापौर संघटने कडून निषेध 

Ganesh Kumar Mule Sep 07, 2025 4:24 PM

PMC Municipal Secretary Department | महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडे जवळपास ४० वर्ष काम करणारे कड, बहिरट सेवानिवृत्त!
PMC Deputy Municipal Secretary Promotion | उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत आता विभागीय आयुक्त देणार फैसला! | २२ ऑक्टोबरला सुनावणी
PMC Deputy Municipal Secretary Promotion | उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत उचित कार्यवाही करण्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आदेश

Ganesh Visarjan 2025 | टिळक पुतळ्या जवळील महापालिकेच्या स्वागत कक्षावर पोलिसांचे अतिक्रमण : माजी महापौर संघटने कडून निषेध

 

Pune Ganesh Immersion 2025 – (The Karbhari News Service) – टिळक पुतळ्या जवळील महापालिकेच्या स्वागत कक्षावर पोलिसांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून आले. इथे अनेक लोकप्रतिनिधीना आत जाऊ दिले नाही. याचा माजी महापौर संघटनेकडून निषेध करण्यात आला. (Pune News)

माजी महापौर संघटनेचे अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदन नुसार  गेली वर्षानुवर्षे प्रथे प्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन मिरवणुकीसाठी टिळक पुतळा या ठिकाणी स्वागत कक्ष उभारते. महापालिकेचा  तेथील सर्व व्यवस्था पाहतो, पण यावर्षी मात्र पोलिसांनी तेथील ताबा घेतला, कसबा गणपतीची पालखी ठेवण्यासाठी नेहमीची जागा देखील बदलली. त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींना आत जाऊ दिले नाही , माजी नगरसेवक, माजी महापौर, माध्यम प्रतिनिधी, पत्रकार संघाचे अध्यक्ष यांना देखील तेथे जाण्यास पोलिसांनी अडविले. या प्रकाराचा आम्ही माजी महापौर संघटनेतर्फे निषेध करीत आहोत. असे संघटने कडून सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: