Ganesh Bidkar | PMC Pune | साथीच्या रोगांना नियंत्रणात आणा | गणेश बिडकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 

HomeHealth

Ganesh Bidkar | PMC Pune | साथीच्या रोगांना नियंत्रणात आणा | गणेश बिडकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 

Ganesh Kumar Mule Sep 20, 2024 9:01 PM

PMC Employee : मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप
40% tax rebate | ४०% कर सवलत | अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार | महापालिकेने सद्यस्थितीत वाढीव रक्कम घेऊ नये | बैठकीत सूचना
Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 

Ganesh Bidkar | PMC Pune | साथीच्या रोगांना नियंत्रणात आणा | गणेश बिडकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – सध्यःस्थितीमध्ये संपुर्ण पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर डेंग्यू, चिकनगुणिया व इतर साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या साथीच्या रोगांना नियंत्रणात आणा, अशी मागणी महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

बिडकर यांनी प्रसिद्धीस यामध्ये पुणे शहरातील सर्वच भागांमधील नागरिक या रोगांचे बळी झाले असल्याने पुणे शहरातील सर्व छोटे-मोठया रुग्णालयांमध्ये नागरिकांना औषधोपचाराकरिता बेडसाठी प्रतिक्षा करावी लागत असून वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेक नागरिकांची तब्येत खालावत असून यामध्ये काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.

बिडकर यांनी पुढे म्हटले आहे कि, तसेच पुणे मनपामार्फत कीटक फवारणी देखील फक्त पुणे मनपाच्या कायम सेवकांमार्फत सुरु असून सेवक संख्या ही अपुरी असल्याने पुणे शहराच्या संपुर्ण परिसरामध्ये कीटक फवारणी पुर्णपणे होत नाही. त्याचअनुषंगाने पुणे मनपामार्फत गेले अनेक वर्षांपासून कीटक फवारणी करिता निविदा राबवून कंत्राटी कर्मचा-यांमार्फत पुणे शहरामध्ये संपुर्ण परिसरामध्ये कीटक फवारणी करण्यात येत होती, परंतु गेले ३ ते ४ वर्षे सदर निविदा प्रक्रिया न राबविल्यामुळे पुणे शहराच्या संपुर्ण भागात कीटक फवारणी होत नाही व त्यामुळेच सर्वत्र साथीचे रोग झपाटयाने पसरत आहेत.

याबाबत आज महापालिका आयुक्त यांची समक्ष भेट घेतली. संपुर्ण पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर डेंग्यु, चिकनगुणिया व इतर साथिच्या रोगांचा प्रमाण वाढत असल्याने सदर रोगांबाबत पुणे मनपामार्फत त्वरीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून साथीच्या रोगांना नियंत्रणात आणावे, अशी मागणी आयुक्त यांच्याकडे केली. तसेच याबाबत संपुर्ण पुणे शहरामध्ये जनजागृती करण्यात यावी. जेणेकरून पुणे शहरातील नागरिक सतर्क राहूण आरोग्याची दक्षता घेतील. अशी मागणी देखील आयुक्त यांच्याकडे केली, असे बिडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0