Ganesh Bidkar Nomination | गणेश बिडकर प्रभाग क्रमांक 24 मधून मैदानात | गणेश बिडकरांचा भाजपाकडून पुण्यातील पहिला उमेदवारी अर्ज!
PMC Ward 24 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस उरला आहे. अद्यापही प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे उमेदवारी निश्चित करण्यात आलेल्या काही उमेदवारांना थेट पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा पहिला अर्ज माजी सभागृह नेते आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या रूपाने आज दाखल झाला. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025-26)
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्र. २४ साठी गणेश बिडकर यांनी सोमवारी सकाळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हेमंत रासने यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापालिका निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. तसेच प्रभागातील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास बिडकर यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
संपूर्ण पुणे शहरात भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळून अर्ज दाखल करणारे गणेश बिडकर हे पहिले उमेदवार ठरले. बिडकर यांच्यासोबतीने प्रभागातील इतर तिन्ही उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरभरून मतदान केले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही पुणेकर आमच्या मागे राहतील, जगातील सर्वात महत्त्वाचे शहर म्हणून पुणे जगाच्या नकाशावर यावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी गेल्या कार्यकाळात आम्ही अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्त्वास नेले आहे. येत्या कार्यकाळात पुण्याला आणखी पुढे न्यायचे आहे.”
- गणेश बिडकर, प्रभाग क्र. २४

COMMENTS