G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!
| सिंहगड रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
G 20 summit in pune | Sinhagad Fort | (Author: Ganesh Mule) | पुण्यात जून महिन्यात G- २० परिषद (G 20 Summit in Pune) होणार आहे. या परिषदेसाठी निमंत्रित परदेशी पाहुण्याना महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी (Maharashtrian Culture) अवगत करायचे आहे. त्यानुसार पुण्यापासून जवळच असलेल्या सिंहगड किल्ल्याची (Sinhagad Fort) सफर या पाहुण्यांना घडवून आणली जाणार आहे. त्यानुसार या पर्यटन भेटीकरिता पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती, व सुशोभिकरण (Sinhagad Road Maintenance and beautification) करुन घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) , जिल्हा परिषद (Pune Zilla parishad) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला(PWD) दिले आहेत. (G 20 summit in pune | Sinhgadh Fort)
जी-२० परिषदेचे आयोजन भारत, इटली व इंडोनेशिया या ३ देशात दि.१/१२/२०२२ ते पुढील १ वर्ष या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये १२ ते १४ जून २०२३ या कालावधीत माहिती व तंत्रज्ञान या विभागाची तिसरी बैठक पुणे (G 20 Summit In Pune) येथे होणार आहे. या महत्वकांक्षी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी केंद्रशासनाच्या बरोबरच राज्य शासनावरही असून या कालावधीमध्ये जगातील जवळपास ४० देशांमधून सुमारे १०० मान्यवर सदर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. (Sinhagad Fort News)!
तिस-या DEW Group च्या दि. १२ जून ते १४ जून दरम्यान पुणे येथे होणा-या बैठकीच्या पूर्व नियोजनबाबतच्या सूचना राज्याचे उपसचिव यांचेकडून प्राप्त झालेल्या आहेत. (Sinhagad Road Maintenance and beautification)
त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे पत्र दि. १५/०५/२०२३ नुसार दि. १२ ते १४ जून DEWG परिषद आयोजित करणेत आली आहे. यासाठी येणाऱ्या निमंत्रितांना स्थानिक पर्यटन व स्थळ दर्शनांतर्गत किल्ले सिंहगड येथे घेऊन जाणे नियोजित आहे. मात्र या कालावधीमधे पुणे येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी असले कारणाने निमंत्रीत पाहुण्यांना NDA खडकावासला मार्गे सिंहगडावर नेणे नियोजित आहे. त्यास्तव उपरोक्त मार्गाचा आपल्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभिकरण यास तात्काळ सुरुवात करावी. असे आदेश विभागीय आयुक्त यांनी पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
——
News Title | G20 Summit in Pune | Sinhagad Fort | Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad! | Divisional Commissioner’s order to beautify Sinhagad road