सुस आणि म्हाळुंगे गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही
:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आश्वासन
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावातील प्रलंबित असलेल्या स्मशानभुमी जवळील नाला चॅनेलींग व मुख्य रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी ७ वाजता सुस येथे भेट दिली. यावेळी अजित दादा पवार यांनी सदर कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर येथील विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून आणणारे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांमुळे येथे विकास कामे करणे शक्य झाले, दिवसरात्र याठिकाणी उभे राहून स्वतः काम करून घेणे असा लोकप्रतिनिधी तुमच्या आमच्या सारख्याना मिळाला त्यामुळे चांदेरे यांचे कौतुक करू तेवढे कमीच आहे. त्याचबरोबर सुस आणि म्हाळुंगे या दोन्ही गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही, असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले.
: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावू
सदर काम दर्जेदार व्हावे व पावसाळ्याच्या आधी काम पुर्ण करण्याची सुचना पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी केली. या कामासाठी ज्यांनी सहकार्य केले व जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुस येथील चांदेरे व ससार परिवाराचे अजित पवार यांनी आभार मानले.
पुणे महानगरपालिकेमध्ये सुस व म्हाळुंगे गावाचा समावेश झाल्यापासुन महानगरपालिके तर्फे गृहप्रकल्पांना टॅंकरने पाणी पुरवठा चालु करण्यात आला होता. परंतु प्रशासनाने काही कालावधी नंतर हा पाणी पुरवठा बंद केला. आज सर्व गृहप्रकल्पातील नागरिकांनी अजित दादा पवार यांना या संदर्भात निवेदन दिले की टॅंकरने पाणी पुरवठा पुन्हा चालु करावा त्यावर पवार यांनी सांगितले कि लवकरात लवकर टॅंकरने पाणी पुरवठा चालु होईल तसेच कायम स्वरुपात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात येईल.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे , ज्ञानेश्वर मोळक, पी. डब्लू. डी चे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे,नामदेव चांदेरे, राजाभाऊ हगवणे, महादेव कोंढरे ,मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे ,गोवर्धन बांदल ,चंद्रकांत काळभोर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे ,सुषमा निम्हण ,डॉ. सागर बालवडकर , समीर चांदेरे , नितीन कळमकर ,संजय ताम्हाणे, मनोज बालवडकर , सौ पुनम विशाल विधाते , सौ. सुषमा ताम्हाणे , सौ. राखी श्रीराव तसेच सुस ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच ,उपसरपंच, सदस्य त्याचबरोबर सुस मधील ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी,गृहप्रकल्पातील नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस गावामध्ये अजित दादा पवार यांनी भेट दिली त्याबद्दल संपुर्ण सुस ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांचे मनःपुर्वक आभार मानले.
COMMENTS