वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी
: आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती
बार्शी : बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव-चिखर्डे- गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले, ५ कोटी रुपयांचा निधी हा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१ – २०२२ अंतर्गत योजनेतर तरतूदी मधून रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमानुसार मंजूर करण्यात आला आहे.
: रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य
दरम्यान सद्य स्थितीत या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक ठरते आहे. कारण रस्त्यावर जागोजागी खड्डे तयार झाले आहेत. लोकांना कसरत करूनच गाड्या चालवाव्या लागतात. नागरिकांची ओरड झाल्याने या अगोदर बऱ्याच वेळा रस्ता दुरुस्ती केली गेली, मात्र ती मलमपट्टी कुचकामी ठरली. नागरिकांचा त्रास काही कमी झाला नव्हता. कारण पाऊस पडून गेल्यावर पुन्हा खड्डे तयार होत गेले. आता ५ कोटी निधी मंजूर झाल्याने आता तरी रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त होईल. अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
COMMENTS